Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / अंगावरच्या कोडामुळे घराबाहेर काढलं, आज शिळ्या भाकरी विकून महिन्याला कमावतेय लाखो रुपये

अंगावरच्या कोडामुळे घराबाहेर काढलं, आज शिळ्या भाकरी विकून महिन्याला कमावतेय लाखो रुपये

आयुष्यात संकटांचा सामना करायचं जर एकदा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी जिद्द आपल्यामध्ये असेल तर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. हे सिद्ध करणाऱ्या एका महिलेची यशोगाथा आपण आज बघणार आहोत. या महिलेचं अवघ्या चौदाव्या वर्षी ९ वी मध्ये असताना लग्न झालं. अंगावर पांढरं असल्यामुळे कुटुंबात वाद होऊ लागले. घरच्यांनी घराबाहेर काढलं. नवऱ्याने साथ दिली. अनेक छोटे मोठे काम करत आज हि महिला वर्षाकाठी कोटीची उलाढाल करत आहे. जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास..

सोलापूरच्या लक्ष्मी सुरेश बिराजदार. लक्ष्मी यांचं कुटुंब मूळचं कर्नाटकचं पण ते दौंडमध्ये राहत असत. दौंडमध्येच लक्ष्मीचं नववीपर्यंतचं शिक्षण झालं. अंगाला पांढरं असल्यामुळे तिच्या आयुष्यात एक वेगळं दुःख होतं. तिच्या लग्नाचा विचार करून आई वडील रडत बसायचे. त्याच दरम्यान अचानक एका पाहुण्यांनी लक्ष्मीला स्थळ आणलं. मुलाकडचे तिच्या पांढऱ्यामुळे नको म्हणत होती. पण सुरेश बिराजदार यांनी घरच्यांना समजावून लक्ष्मीसोबत लग्न केलं.

वर्षभर सर्व कुटुंबासोबत लक्ष्मीचा संसार चांगला चालला. वर्षभरानंतर घरात वाद सुरु झाले. पती पत्नी सोलापूरला आले. तिथं नवऱ्याने गवंडी काम चालू केलं तर लक्ष्मी या घरी काही छोट्या मोठ्या वस्तू बनवून विकू लागल्या. पण तेवढ्यात घर चालत नव्हतं. मग लक्ष्मी यांनी ट्युशन घ्यायला देखील सुरुवात केली. ट्युशन हळू हळू प्रसिद्ध झालं. मुलं वाढली. ३ शिफ्टमध्ये ट्युशन घेतले. पण पुढे मुलगा आणि मुलीकडे लक्ष देण्यास तिला वेळ कमी पडू लागला. पती देखील मुलाकडे घराकडे लक्ष नाही असं म्हणू लागले. त्यांच्यात वाद होऊ लागले.

पुढे ट्युशन बंद करून घराकडे लक्ष द्यायला लागली. क्लास बंद करून लक्ष्मी महिनाभर शांत घरी बसली. पण तिला रिकामं बसून राहणं पटत नव्हतं. नंतर एका मैत्रिणीला सोबत घेऊन कडक भाकरी बनवून विकूया अशी कल्पना त्यांना सुचली. भाकरी बनवल्या. मार्केटिंग सुरु केलं. एका दुकानदाराकडे जेव्हा त्या भाकरी ठेवा म्हणायला गेल्या तेव्हा दुकानदार म्हणाला तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. लोक आजकाल घरातल्या ताज्या भाकरी लवकर खात नाही तुझ्या शिळ्या भाकरी कोण खाणार.

दुकानदाराला विनंती करून त्यांनी भाकरी विकायला ठेवल्या. ठेवलेल्या भाकरी विकल्या गेल्या. दुकानदाराने ज्वारी बाजरीच्या भाकरीचे १०-१० पॅकेट आणून दे म्हणून फोन केला. त्यांनी खूप उत्साहाने भाकरी बनवून नेऊन दिल्या. नवरा देखील आधी नाव ठेवायचा शिळ्या भाकरी काय विकतेय म्हणून. पण नंतर नवरा दुकानावर सोडायला आला. लक्ष्मीला खूप आनंद झाला. पुढे त्यांनी मोठ्या उमेदीने सुरुवात केली. नवीन दुकान शोधली. ऑर्डर वाढत गेल्या. २०१२ मध्ये सुरु झालेला व्यवसाय २०१४ पर्यंत हळू हळू चालू होता. पुढे वेगवेगळ्या कार्यक्रमात भाकरी ठेवल्या. जत्रांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

जे लोक तिला शिळ्या भाकरी विकते म्हणून वेडी म्हणायचे ते पुढे मोठ्या सणाच्या वेळेला भाकरी बनवून विकायला लागली. पुढे केव्हीके मध्ये प्रशिक्षण घेतलं. व्यवसायाचं ब्रॅण्डिंग केलं. वेगवेगळे पदार्थ शिकले. पुढे हैद्राबाद मध्ये स्टॉल लावण्याची संधी लक्ष्मीला मिळाली. तिथं स्टॉलला ३ तास काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पण लक्ष्मीने दही आणून सोलापूर चटणी मिक्स केली. अन येणाऱ्या लोकांना टेस्ट करायला दिली. लोकांना ते खूप आवडलं. संयोजकांनी त्या कार्यक्रमाच्या जेवणासाठीच लक्ष्मीचा सर्व माल उचलून नेला.

लोक तरीही तिच्याकडे येत होते. संयोजकांनी तिच्या मालाचे ७ हजार रुपये दिले. अर्ध्या तासात स्टॉल रिकामा झाला. परतल्यावर बारामतीमधून फोन आला. पुरस्कार मिळाला. पुढे ज्वारीचे केक, ज्वारीचे बिस्किटे असे पदार्थ ठेवायला सुरुवात केली. पुण्यात एका प्रदर्शनात स्टॉल लावला. २-२ हजार ज्वारी बाजरी भाकरी, शेंगदाणा चटणी धपाटे असा माल आणला. पण तो माल एकाच दिवसात संपला. नवऱ्याला फोन करून सांगितलं कि माल एकाच दिवसात संपला तर त्यांना विश्वास बसत नव्हता. अखेर त्यांनी रात्रीच पुन्हा २-२ हजार भाकरी पाठवल्या. चार दिवस त्यांना असाच करावं लागलं.

चार दिवसात १ लाख ६० हजारांची विक्री तिथं झाली. ५ महिला कामाला होत्या. पुढे २० झाल्या. लोकांच्या डोळ्यात प्रगती खुपायला लागली. मालक म्हणाला तू खूप गर्दी करतेय भाडं वाढवावं लागेल. मालकाने दरमहिन्याला भाडं वाढवलं. अखेर त्या मालकाला विचारून त्याची ६ लाखाची जागा लक्ष्मीने ८ लाखाला विकतच घेतली. तिथं २ च खोल्या होत्या. मीडियामध्ये यशाची बातमी येत गेली. सर्वत्र नावाची चर्चा झाली.

अनेकांना मग मार्गदर्शन करून मार्केटिंग करायला शिकवलं. पुढे बँकेकडून लोन घेऊन घर बांधलं. ३ मजली बंगला उभा केला. अनेक मशिनरी देखील खरेदी केल्या. अनेक महिलांना रोजगार दिला. आधी ज्या लक्ष्मीला कोणी विचारत नव्हतं तिला आज पैसे आल्यावर सर्व लक्ष्मीताई लक्ष्मीताई म्हणून विचारतात. पुढे काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने अमेरिकेत भाकरी पाठवल्या. नंतर असे अनेक फोन आले. युरोप, फ्रांसमध्ये भाकरी जायला लागल्या. आज महाराष्ट्रात सर्वत्र भाकरी जातात. लक्ष्मीने जिद्दीने केलेला हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *