Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / अंबानी कुटुंबाला नको होती बॉलिवूडमधली सून, त्यांचा विरोध डावलून अभिनेत्री बनली अंबानींची सून

अंबानी कुटुंबाला नको होती बॉलिवूडमधली सून, त्यांचा विरोध डावलून अभिनेत्री बनली अंबानींची सून

धीरूभाई अंबानी हे भारतातच नाही तर जगातील एक प्रेरणादायक व्यक्तींपैकी एक आहेत. गरिबीतून येऊन चुलतभावासोबत सुरु केलेला रिलायन्स उद्योग समूह आज देशातच नाही तर जगात टॉपला आहे. अंबानी हे जगातील एक श्रीमंत कुटुंब आहे. ३०० रुपये महिन्याने पेट्रोल पंपावर काम केलेल्या धीरूभाईंचा मुलगा आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

धीरूभाईंना २ मुलं आणि २ मुली आहेत. पहिले मुकेश अंबानी आणि दुसरे अनिल अंबानी. तर दीप्ती आणि नीना या २ मुली. धीरूभाईंनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. मुकेश यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात आणि अनिल अंबानी यांनी अमेरिकेतच वार्टन स्कुलमध्ये शिक्षण घेतले. धीरूभाई हे संस्काराच्या बाबतीत मुलांना खूप धाकात ठेवायचे.

धीरूभाईंनी मुलांना नेहमीच चांगले संस्कार दिले. आपल्या मुलाने लग्न देखील कुणाशी करावे आणि कुणाशी नाही हे ते ठरवत असत. आपल्या मुलांनी बॉलिवूडमधील मुलगी घरी सून म्हणून आणू नाही अशी त्यांची इच्छा होती. अभिनेत्रीशी लग्न करण्यास त्यांचा विरोध होता. पण मुलगा अनिलने बॉलिवूड अभिनेत्री टिना मुनीम सोबत कुटुंबाचा विरोध डावलून लग्न केले.

टिना मुनीम आणि अनिल अंबानी याना लग्न करण्यासाठी खूप झेलावे लागले. १९८६ मध्ये टिना मुनीम आणि अनिल अंबानी यांची पहिली भेट झाली. दोघे एका कॉमन मित्राच्या लग्नात आले होते. याच लग्नात अनिलने टिनाला पहिल्यांदा पाहिलं. टिना हि दिसायला सुंदर होती. ती काळ्या रंगाच्या साडीत लग्नाला आली होती. तेव्हाच अनिल तिच्या प्रेमात पडले.

दोघांनी त्या लग्नात एकमेकांना फक्त बघितलं होतं. बोलणं काही झालं नव्हतं. पण नशीबाने त्यांना पुन्हा भेटवलं. अनिल अंबानी हे फिलाडेल्फियाला गेलेले होते. तिथं त्यांची पुन्हा भेट टीनासोबत झाली. त्यावेळी दोघांमध्ये बोलणं झालं. तेव्हा टिनाला रिलायन्स विषयी काहीही माहिती नव्हती. टिनाला देखील पहिल्याच नजरेत अनिल पसंत पडले होते.

दोघांमध्ये तिथून पुढे चांगली मैत्री झाली. एकदा मैत्री झाली म्हणजे काय विषयच संपला. पुढे दोघे सारखं एकमेकांना भेटायला लागले. हळू हळू दोघांचं प्रेम देखील फुलत गेलं. दोघं एकमेकांच्या प्रेमात प्रचंड बुडाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या लग्नाचा विषय काही सोपा नव्हता. कारण धीरूभाईंना बॉलिवूडमधील सून नको होती.

अनिल यांनी जेव्हा टीनाबद्दल घरी सांगितलं तेव्हा त्यांना नकार मिळाला. अनिल यांनीही कुटुंबाच्या विरोधात न जाता टिनापासून दूर जायचं ठरवलं. जेव्हा हि गोष्ट टिनाला समजली त्यावेळी ती काही बोलली नाही पण तिला खूप दुःख झालं. दोघे एकमेकांपासून दूर राहायला लागले. अनेक वर्ष दोघांचे बोलणे बंद होते.

पण १९८९ ला अमेरिकेत मोठा भुकंप आला. टिना लॉस अँजिलीस मध्ये होती. काळजी वाटली म्हणून अनिल यांनी तिचा नंबर शोधून काढला आणि फोन केला. चौकशी केली कशी आहेस म्हणून. उत्तर ऐकून फोन कट केला. पण टिनाला राहवलं नाही आणि तिने पुन्हा फोन केला. नंतर पुन्हा ते बोलायला लागले. या कॉल नंतर अनिल यांनी टीनाशीच लग्न करायचे ठरवले होते. त्यांनी कुटुंबाचा विरोध असताना कुटुंबाला तयार केले. पुढे १९९१ मध्ये दोघांचं कुटुंबाच्या सहमतीने लग्न झालं.

टिना मुनीम अंबानी या ८० च्या दशकातील टॉपच्या बॉलिवूड अभिनेत्री होत्या. १९७५ ला त्यांनी फेमिना टीन प्रिसेंस इंडिया पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर त्यांचं करिअर बहरत गेलं. देव आनंद यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यानंतर सोबत सिनेमे केले. टीना लूटमार, मनपसंद, सौतन, रॉकी, अलग-अलग, कर्ज, ये वादा रहा या हिट सिनेमात दिसली आहे. त्याकाळी ती तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असे. टिना अंबानी या संजय दत्त आणि राजेश खन्ना यांच्यासोबत रिलेशन मध्ये देखील राहिल्या आहेत.

About Mamun

Check Also

पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या बापाने घर विकून शिकवलं, मुलगा खूप कमी वयात बनला IAS !

आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं हे अनेक आईवडिलांचं स्वप्न असतं. पण अनेकदा इच्छा असूनही परिस्थितीमुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *