Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / अखेर सचिन वाझेच्या गॉड फादरचं नाव आलं समोर!

अखेर सचिन वाझेच्या गॉड फादरचं नाव आलं समोर!

अँटिलीयाबाहेर ठेवलेल्या गाडीचे प्रकरण आता खूप दुर पर्यंत येऊन पोहचले आहे. या प्रकरणात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सर्वात आधी समोर आले. शिवसेनेशी संबंध असलेल्या वाझेंची बाजू सुरुवातीला महाविकास आघाडी सरकार घेत आहे असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर वाझे विरोधात पुरावे सापडल्याने मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब होत होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पदावरून उचलबांगडी केली. हेमंत नागराळे नवीन मुंबई पोलीस आयुक्त बनले.

या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठे आ रोप केले. त्यानंतर परमबीर सिंग आणि ऍड जयश्री पाटील या हायकोर्टात गेल्या. कोर्टाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नैतिकता म्हणून गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा दिला. दिलीपराव वळसे पाटील राज्याचे नावे गृहमंत्री बनले.

या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता एक नवीन आणि ध क्कादायक खुलासा झाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला एक अहवाल दिला आहे. या अहवालात परमबीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून विरोध असतानाही सचिन वाझेना पोलीस सेवेत भरती करून घेतल्याचे म्हंटले आहे. तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांचा विरोध सचिन वाझेंच्या नियुक्तीला होता. तरी देखील परमबीर सिंग यांनी वाझेंची नियुक्ती केली.

सचिन वाझे एपीआय असताना सुद्धा थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचा. परमबीर सिंग यांच्या सांणगण्यावरूनच सचिन वाझेला हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास दिला जायचा. सचिन वाझेंच्या टीममधील व्यक्ती देखील वरिष्ठांना रिपोर्टींग करू शकत नव्हते. हे सर्व खुलासे हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला दिलेल्या अहवालात केले आहेत.

मंत्र्यांना जे ब्रिफींग परमबीर सिंग याना करावं लागायचं तेव्हा सचिन वाझे देखील उपस्थित असायचा. NIA ला सचिन वाझेच्या ज्या महागड्या गाड्या सापडल्या आहेत त्याच गाड्यातून सचिन वाझे हा कार्यालयामध्ये यायचा. सरकारी गाडी तो वापरत नसे.

निलंबित व्यक्तीला पोलीस खात्यात नियुक्ती मिळाल्यानंतर महत्वाचं पद दिलं जाऊ नये असे आदेश असताना वाझेला CIU च्या प्रमुखपदाची मोठी जबाबदारी मिळाली होती. CIU च रिपोर्टींग हे पोलीस आयुक्तांकडे होतं. हे पद वाझे ला देऊ नाही म्हणून देखील पोलीस अधिकाऱ्यांनी विरोध केला होता.

परमबीर सिंग यांना देखील मनसुख हिरेन आणि अँटिलीया गाडी प्रकरणी चौकशीसाठी NIA ने बोलवलं आहे. परमबीर सिंग यांचा जबाब सीबीआय देखील नोंदवणार आहे. एसीपी पाटील आणि डीसीपी भुजबळ यांचे जबाब देखील सीबीआय नोंदवत आहे.

सनीने वाझे सध्या NIA च्या कोठडीत आहे. वाझने कालच एक नवीन पत्र लिहून काही मोठे आरोप केले होते. त्यात वाझेने मंत्री अनिल परब यांचं देखील नाव घेतलं आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या अहवालानंतर वाझेचा गॉडफादर कोण हि चर्चा सुरु झाली आहे. सचिन वाझेच्या नियुक्तीला विरोध असतानाही त्याला पुन्हा सेवेत परमबीर सिंग यांनि घेतलं होतं असं हा अहवाल सांगतो. त्यामुळे वाझे आणि परमबीर सिंग यांच कनेक्शन काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *