सीमेवर देशाचं रक्षण करणारे जवान देशासाठी जीवाची बाजी लावत असतात. सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांप्रमाणे पोलीस आणि अग्निशमन दलातील जवान देखील आपल्या देशाचे महत्त्वाचे घटक आहेत. हे जवान देखील अनेकदा संकटाच्या वेळी जीवाची पर्वा न करता आपले कार्य करत असतात. फक्त देशाच्या नाही तर देशाचा ध्वज असलेल्या तिरंग्यासाठी देखील जीवाची बाजी हे जवान लावतात.
याचा प्रत्येय मुंबईत आला आहे. मुंबईमधील भांडुप परिसरातील सनराईझ रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडली होती. भांडुप परिसरात असलेल्या ड्रीम्स मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहोचला. यामध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आग लागलेल्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांना एक तिरंगा ध्वज आगीत दिसला. तो ध्वज देखील ज्वालांमध्ये येणार होता. पण एका जवानाने तो झेंडा काढायचं ठरवलं. त्याने आगीत प्रवेश केला. जीवाची बाजी लावली. आणि तो या तिरंग्याला घेऊन सुरक्षित बाहेर आला.
या जवानाचा तिरंगा सुरक्षित बाहेर घेऊन येतानाच हा फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात वायरल झाला आहे. लोक या जवानाचे कौतुक करत असून त्याला सॅल्यूट ठोकत आहेत.
महाराष्ट्र: मुंबई के सनराइज अस्पताल में आग लग गई।
मुंबई कमिश्नर ने बताया, "कल रात को 12 बजे यहां आग लग गई। यहां पर कोरोना के 78 मरीज भर्ती थे। 10 लोगों की मृत्यु हुई है और बाकी मरीजों को दूसरे अस्पताल में भर्ती किया गया है। शुरुआती जांच में अस्पताल की लापरवाही नजर आ रही है।" pic.twitter.com/PK92xcj7PW
— ANI_HindiNews (@AHindinews) March 26, 2021
दरम्यान हे रुग्णालय एका मॉलमध्ये होते. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं पाहत आहे. या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल.
या रुग्णालयात कोरोनाचे देखील रुग्ण होते. काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे त्यांना हलवायला वेळ लागला. अन्य रुग्णांना तातडीने हलवलं गेलं. राज्यात ज्या ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल, जम्बो सेंटरचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या हॉस्पिटलची परवानगी येत्या ३१ मार्चला संपणार होती, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.