पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरु आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. आज राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली.
यावेळी अजित पवारांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या सभेत २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले नेते कल्याणराव काळे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. कल्याणराव काळे हे सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.
कल्याणराव काळे यांनी मागील निवडणूक अपक्ष लढवली होती. तर २०१४ ची विधानसभा त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती. दोन्ही वेळी त्यांनी ६० हजार पेक्षा अधिक मतं घेतली होती. माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात काळे यांचा मोठा जनाधार आहे. कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.
कल्याणरावांचे महत्व समजून भाजपने देखील ते राष्ट्रवादीत जाऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले. अगदी कालपर्यंत त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी भेटी घेतल्या. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे कल्याणराव काळे यांना भेटायला गेल्याचे फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले होते. आज याच भाजपच्या नेत्यांचा अजित पवार यांनी आपल्या भाषणात खास स्टाईलमध्ये समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले, “कल्याणराव भाजप सोडू नाही म्हणून काही नेत्यांनी दोन तीन दिवस कल्याणरावांच्या घरी जाऊन जाऊन बसायचे. त्याच्या आधी कल्याणरावांची आठवण आली नाही. जेव्अहा कानोसा आला कल्रेयाणराव परत साहेबांकडे चालले तेव्हा काही काहींच्या पोटात दुखायला लागल. अरे तुला कुठे घालायची ती घाला ना”
बघा व्हीडीओ-