राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचे आपण बघितले आहे. कुठेही काही चुकीचं काम होताना दिसलं तर बच्चू कडू हे कुठलाही विचार न करता थेट ऍक्शन घेतात. याचाच प्रत्येय अकोला येथे काल आला.
बच्चू कडू हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत. अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली. सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना मेसमध्ये कसं जेवण दिलं जातं याची देखील चौकशी केली. रुग्णांना जेवनाविषयी चौकशी करताना जेवण निकृष्ठ दर्जाचे दिले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संबंधीत ठेकेदारास त्यांनी बोलावून घेतले आणि रुग्णालयाच्या परिसरातच त्याची चौकशी केली. धान्य पुरवठा बाबत देखील विचारणा केली. त्याच्या बोलण्यात तफावत असल्याचे लक्षात आले. कारण धान्य पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याने रोज २३ किलो मूग आणि तूरडाळ लागत असल्याचे सांगितले तर ठेकेदाराने ८-१० किलो वापरत असल्याचे सांगितले. त्यानंतर बच्चू कडूंनी त्या ठेकेदाराच्या कान शिलात लगावली.
यावेळी उपलब्ध धान्यसाठ्याची नोंद कशा पद्धतीने केली जाते, याची पाहणी केली असता आठ महिन्यांच्या धान्य पुरवठ्याच्या नोंदीच झालेल्या नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारला असता त्यांना स्पष्ट सांगता न आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन या प्रकरणावर चौकशी बसविण्याच्या सूचना पालकमंत्री कडू यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांना दिल्या आहेत. या प्रकारानंतर संबंधित पुरवठादारावरही चौकशी बसविण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
व्हिडीओ होतोय व्हायरल-