Sunday , May 28 2023
Breaking News
Home / राजकारण / …अन शरद पवारांच्या सल्ल्याने वाचली आबांची आमदारकी! १०० कोटींचाच होता तो देखील आरोप

…अन शरद पवारांच्या सल्ल्याने वाचली आबांची आमदारकी! १०० कोटींचाच होता तो देखील आरोप

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला न सुटलेलं एक कोडं आहे. शरद पवारांनी आजपर्यंत राजकारणात अनेक चढउतार पाहिले पण ८० वर्षांचे शरद पवार कधीच डगमगले नाहीत. टोकाचे तिरस्कार करणारे विरोधक देखील शरद पवारांच्या कामाचा पुरस्कार करतात. तर शरद पवारांना टिकेतही सन्मान आणि दुश्मनीतही दोस्ती आजपर्यंत लाभली आहे.

शरद पवार हे मागील अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहेत. आज वयाच्या ८० व्या वर्षी देखील महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या आवतुभोवती फिरते आहे. शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही असं म्हणतात. शरद पवार हे दिल्लीत मोठं नाव असलेले असे एकमेव नेते आहेत ज्यांच्या पक्षाचे कमी खासदार आहेत. कारण दिल्लीत पक्षाच्या संख्याबळावर राजकीय वजन ठरतं. मात्र पवारांना हा नियम लागू नाहीये.

आज वयाच्या ८० व्या वर्षी देखील शरद पवार यांची ग्राउंड झिरोवर उतरून काम करण्याची जिद्द आणि तळमळ तसूभरही कमी झालेली नाही. विविध उदाहरणावरून हे स्वतः शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. संकटांचा सामना कसा करायचा हे शरद पवारांकडून शिकण्यासारखे आहे.

२००४ साली शरद पवारांना कॅन्सरने ग्रासलं. पण त्या आजाराशी दोन हाथ करत ते आजही लढत आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात पवारांनी आतापर्यंत अनेकांना हादरे दिले आहेत. शरद पवार हे दिल्लीला आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना एकेकाळी आव्हान दिल होतं. ज्या सोनिया गांधींच्या पवारांनी बोट ठेवलं आणि काँग्रेस सोडून बाहेर पडले त्याच सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांच्याशी आजही सल्लामसलत करतात.

राजकारणातले आणि प्रशासनातच्या कारभारातले अनेक पेच पवारांनी आजपर्यंत सोडवले आहेत. त्यांचा अभ्यास हा प्रचंड आहे. कधी सभागृहाबाहेर त्याची प्रचिती आली तर कधी सभागृहामध्ये प्रचिती आली. शरद पवार यांच्यामुळे एकदा आर आर पाटील आबा यांची आमदारकी वाचली होती. याचा किस्सा आर आर पाटलांनी स्वतः भाषणात एकदा सांगितलं होता.

१९९५ साली महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं. शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आर आर पाटील त्यावेळी तासगावमधून आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यावेळी आबा नवखे आमदार होते. एकेदिवशी त्यांनी विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर जोशींना घाम फुटेल असं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यावर १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला.

त्यावेळी शरद पवार हे खालच्या सभागृहातून त्यांच्या ऑफिस मधून हे भाषण स्पीकरवर ऐकत होते. त्यांनी आर आर आबांना चिट्ठी पाठवून खाली बोलावलं. आबांनी सहारा प्रकरणात मनोहर जोशींनी १०० कोटींचा भ्र ष्टाचार केला असा आरोप केला होता. पवार त्यांना म्हणाले तुमचे आरोप मी ऐकले. तुमच्याकडे पुरावे आहेत का अशी विचारणा केली.

त्यावेळी आर आर पाटील म्हणाले पुरावे तर काहीच नाहीत. आर आर पाटील पवारांना म्हणाले विधानसभेत बोललं तर मानहानीचा दावा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे हवेतच आरोप केले आहेत. पवार म्हणाले मानहानीचा दावा नाही पण विशेषाधिकार वापरून तुमची आमदारकी जाऊ शकते. त्यावेळी आबा म्हणाले साहेब चुकलं माझं. शरद पवार त्यांना म्हणाले तुमचं भाषण कन्फर्म करण्यासाठी एक प्रत येईल, त्यात अशा बाहेर चर्चा आहेत या ओळी टाकायला लावल्या.

आर आर पाटलांकडे भाषणाची प्रत कन्फर्म करण्यासाठी आली. त्यांनी भाषणाच्या शेवटी १०० कोटींच्या आरोपाच्या त्या भाषणात बाहेर अशा चर्चा आहेत हि वाक्य टाकली. शरद पवार यांच्या या सल्ल्यानेच आबांची आमदारकी वाचली होती. कारण मनोहर जोशींनी विशेषाधिकार वापरून त्यांची आमदारकी घालवण्यासाठी प्रयत्न देखील केला होता. पण विधानसभेच्या सचिवांनी त्या शेवटच्या वाक्यामुळे यात विशेषाधिकार वापरता येत नाही असे सांगितले अन आबांची आमदारकी वाचली.

About Mamun

Check Also

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *