सुषमा स्वराज यांचे नाव भाजपचा वरिष्ठ नेत्यांमध्ये येते. विदेश मंत्री म्हणून त्यांचे नाव चांगलेच चर्चेत असायचे. सुषमा यांना २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर विदेश मंत्रिपद मिळालं. पण खरतर त्या या पदापेक्षा मोठ्या पदाच्या दावेदार होत्या. सुषमा यांच्या पक्षातील वजनानुसार त्या पंतप्रधान व्हायला हव्या होत्या. जाणून घेऊया कसे..
सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानपदावरील दावा अप्रत्यक्षरीत्या बोलून देखील दाखवला होता. २०१४ मध्ये देशभरात काँग्रेसविरुद्ध वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे काँग्रेसची सत्ता जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. त्यामुळे भाजपला एका पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा शोध होता. लालकृष्ण अडवाणी यांचे नाव त्यावेळी सर्वात पुढे होते.
लालकृष्ण अडवाणी हे २००९ मध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी भाजपमध्ये २ मोठे नाव देखील या रेसमध्ये असायचे. ते नाव म्हणजे मुरली मनोहर आणि सुषमा स्वराज. पण भाजपमध्ये तेव्हा जेष्ठतेवर नाही तर पदानुसार पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरायचा. जो विरोधी पक्षनेता असेल त्याला पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार केले जायचे.
२००४-२००९ लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्षनेते होते. आणि भारतात ब्रिटीशकालीन वेस्टमिन्स्टर संसदीय परंपरा चालू होती. या परंपरेनुसार विरोधी पक्षनेता हा पंतप्रधान पदाचा उमेदवार असायचा. त्यामुळे साहजिक २००९ ला अडवाणी उमेदवार होते. २००९ मध्ये भाजपचा पराभव झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या बनल्या सुषमा स्वराज.
आता पक्षात चालू असलेल्या परंपरेनुसार २०१४ ला सुषमा स्वराज यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सर्वात पुढे असायला हवं होतं. पण भाजपकडून या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा काही होत नव्हती. भाजप पत्ते का खुले करत नाही याबद्दल कोणालाच काही समजत नव्हते. याच दरम्यान सुषमा याना पत्रकारांनी पूढील पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला होता.
त्यावेळी सुषमा यांनी उत्तर देताना वेस्टमिन्स्टर मॉडल ची आठवण करून देत अगोदरचा विरोधी पक्षनेता पुढील पंतप्रधानपदाचा उमेदवार असतो असे सांगितलं. यानुसार त्याच या पदाच्या उमेदवार २०१४ मध्ये होत्या. त्यांनी एकप्रकारे स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. या जुन्या परंपरेनुसार सुषमा स्वराज या २०१४ च्या पंतप्रधान व्हायला हव्या होत्या.
सर्व काही सरळ राहीलं असतं तर त्याच पंतप्रधान पदाच्या उमेदवार राहिल्या असत्या. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मान्य नव्हते. त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे या पदासाठी योग्य वाटले. जेष्ठतेनुसार २०१४ मध्ये ना अडवाणींना पंतप्रधान पद मिळालं ना परंपरेनुसार सुषमा स्वराज यांना. ते मिळालं नरेंद्र मोदी या नव्याने राष्ट्रीय राजकारणात आलेल्या चेहऱ्याला.
मोदींनी सुषमा यांचा सन्मान म्हणूनच विदेश मंत्री पद दिले होते असे म्हंटले जाते. पण अडवाणींना मात्र मार्गदर्शक मंडळच मिळालं. असं देखील बोललं जातं कि काँग्रेसविरुद्ध वातावरण असल्याने २०१४ मध्ये मोदींऐवजी स्वराज या उमेदवार असत्या तरी भाजपची सत्ता आली असती अन त्या पंतप्रधान बनल्या असत्या.