बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्तचे आयुष्य खूप चढ उताराचे राहिले आहे. संजय दत्तने १९८७ मध्ये ऋचा शर्मा सोबत लग्न केलं. १९९८ मध्ये तो एका मुलीचा पिता देखील बनला. पण १९९६ मध्ये पत्नी ऋचाचे कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर त्याने १९९८ मध्ये रिया पिल्लै सोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील टिकू शकलं नाही.
२००५ मध्ये संजय दत्त हा रियापासून वेगळा झाला. यानंतर २००८ मध्ये संजय दत्तने मान्यता दत्त सोबत तिसरे लग्न केले. २१ ऑक्टोबर २०१० ला संजय आणि मान्यता हे जुडवा बाळांचे पिता बनले. मान्यता आणि संजय दत्त यांचे आयुष्य सुखदुःखाने भरलेले राहिले आहे. दोघांनी अनेक चढउतार आयुष्यात बघितले आहेत.
मान्यता दत्तचा प्रवास देखील संजय दत्त प्रमाणे खूप संघर्षमय राहिला आहे. तिने एका सामान्य कुटुंबातून येऊन आपलं आयुष्य बदललं आहे. मान्यताचे फिल्मी करिअर खूप छोटे होते. दत्त कुटुंबाची सून बनण्यापूर्वी मान्यताने आयटम गर्ल म्हणून आणि बी ग्रेड सिनेमात काम केले आहे. लग्नानंतर तिने हे करिअर सोडले.
मान्यताचा जन्म २२ जुलै १९७८ ला एका मुस्लिम कुटुंबात झाला. मान्यताचे लग्नापूर्वी नाव दिलनवाज शेख होते. मान्यताचे बालपण दुबईत गेले. मान्यता जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्री मध्ये ती याच नावाने ओळखली जायची. प्रकाश झा यांची आयटम नंबर हि फिल्म केल्यानंतर तिने आपले नाव मान्यता ठेवले.
मान्यताचा संजय दत्त हा दुसरा पती आहे. मेराज उर रहमान सोबत तीच पहिलं लग्न झालं होतं. पण दोघांचं कधी जमलंच नाही आणि त्यांनी तलाक घेतला. वडिलांच्या निधनानंतर तिच्या खांद्यावर सर्व ओझं आलं आणि ती फिल्मी करिअर पासून दूर गेली. आज मान्यता संजय दत्तच्या प्रोडक्शनची सीईओ आहे.
मान्यताला सर्वात आधी ओळख प्रकाश झा यांच्या गंगाजल सिनेमात आयटम सॉंग केल्यानंतर मिळाली. आयटम सॉंग अल्लड दिवाणी मध्ये तिने जबरदस्त डान्स केला होता. मान्यता एक यशस्वी अभिनेत्री बनायचं होतं. पण तिला ऑफरच न मिळाल्याने तिने बी ग्रेड सिनेमात देखील काम केलं. मान्यताच्या Lovers Like Us सिनेमाचे संजय दत्तने हक्क खरेदी केले होते.
याच दरम्यान त्यांची मिटिंग मध्ये ओळख झाली. या ओळखीतून दोघांची मैत्री आणि पुढे भेटीगाठी सुरु झाल्या. मान्यता कोणाला न कळू देता संजय दत्तला भेटायला जाऊ लागली. ती संजय दत्तला नेहमी आपल्या हातच जेवण खाऊ घालायची. तिने संजय दत्तचं मन जिंकलं आणि २००८ मध्ये दोघांनी लग्न केलं. तिचे त्यावेळी वय फक्त २९ तर संजय दत्तचे वय ५० होते.
मान्यता आणि संजय दत्त हे आज ८०० कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे मालक आहेत. एकेकाळी बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच आयुष्य संजय दत्तच्या भेटीनंतर बदलूनच गेलं.