शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आज प्रत्येकाला माहिती आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांची ख्याती संपूर्ण देशाला माहिती आहे. बाळासाहेबांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एक वेगळाच दबदबा होता. मराठी माणसांच्या हक्कासाठी तयार केलेल्या संघटनेने पुढे मोठे साम्राज्य उभे केले.
महाराष्ट्रात तर बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यांची देवासमान पूजा करतात. शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांची जी क्रेझ होती ती आजही कायम आहे. अमिताभ बच्चन हे देखील बाळासाहेब ठाकरे यांचे खूप जवळचे मित्र होते. अमिताभ म्हणतात कि बाळासाहेब हे त्यांच्यासाठी कुटुंबासारखे होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे बॉलिवूडमधल्या इतरही अनेक कलाकरांसोबत चांगले संबंध होते. अनेक अभिनेते तर त्यांचे चांगले मित्र होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना संकटाच्या काळात बाळासाहेबांनी मदत केली आहे. असाच अनुभव स्वतः अमिताभ बच्चन यांनी देखील सांगितला होता.
अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बोफो र्स घो टाळ्यात अडकलं होतं. त्यावेळी बाळासाहेबांनीच त्यांना या समस्येतून बाहेर काढले होते. बाळासाहेबांनी अमिताभ याना सत्यता काय आहे म्हणून विचारले होते. त्यानंतर बाळासाहेबांना अमिताभ यांनी यामध्ये काही सत्य नसल्याचे सांगितले होते. नंतर बाळासाहेबांनी त्यांना शब्द दिला कि घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे.
एवढेच नाही तर कुली सिनेमाच्या वेळी अमिताभ यांचा जो अ पघा त झाला होता त्यावेळी देखील बाळासाहेबच सर्वात आधी धावून आले होते. अमिताभ यांनी सांगितलं कि तेव्हा ते बंगळुरू वरून मुंबईला आले होते. तेव्हा पाऊस खूप होता आणि ऍ म्ब्युलन्स देखील मिळत नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेनेची ऍम्ब्युलन्स पाठवली होती.
अमिताभ यांनी जया सोबत लग्न केल्यानंतर दोघांना बाळासाहेबांनी घरी देखील आमंत्रित केले होते. बाळासाहेबांचं नि धन हे अमिताभ यांच्यासाठी देखील खूप दुःखद होतं. बाळासाहेबांना अमिताभ वडिलांसमान मानतात. अमिताभ हे जेव्हा बाळासाहेबांना बघायला गेले होते तेव्हा त्यांच्यासोबतचा एक फोटो फ्रेम करून बेडच्या बाजूला ठेवलेला होता.