भारतात एक असं झाड आहे ज्यावर लाखो रुपये सुरक्षेसाठी खर्च केले जातात. असं म्हंटल्यावर तुमचा यावर लवकर विश्वास बसणार नाही. पण हे खरं असून भारतातील मध्ये प्रदेशात असं एक झाड खरंच आहे ज्यावर वर्षाला सुरक्षेसाठी १०-१२ लाख रुपये खर्च केले जातात.
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात सांची स्तूपाजवळील एका टेकडीवर असलेल्या या झाडाच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात आहेत. एवढेच नाही तर या झाडाला १५ फूट उंच लोखंडी जाळ्यांनी घेरलेलं आहे. जेणेकरून या झाडाच्या आसपास कोणी जाणार नाही.
या VVIP झाडाला काय पैसे वगैरे येतात का काय असा प्रश्न पडला तर नवल नाही. या झाडाला पैसे वगैरे येत नसून हे झाड खरच एक अतिमहत्वाचं झाड आहे ज्याचा ऐतिसाहिक वारसा आहे.
सर्वसामान्य नसलेले हे झाड त्या बोधी वृक्षाच्या कुटुंबाचा हिस्सा आहे ज्याच्या सावलीखाली भगवान गौतम बुद्ध यांनी ज्ञान प्राप्ती केली होती. या झाडाची त्यामुळेच विशेष काळजी घेतली जाते. या वृक्षाला पाणी देण्यासाठी खास टँकर आहे. तसेच झाडाला काही होऊ नये यासाठी वनाधिकारी देखील नेहमी याची काळजी घेत असतात.
या झाडाच्या सुरक्षेवर वार्षिक १०-१२ लाख रुपये खर्च केले जातात. रायसेन जिल्ह्यातील सांची स्तूप हे मौर्य वंशाचे सम्राट अशोक यांनी उभारलं होतं. त्यांनी भगवान बुद्धांना श्रद्धांजली देण्यासाठी अशा स्तूपांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.