Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, त्याला नक्कीच यश मिळते. आयएएस अंकिता चौधरीची यशोगाथा असंच काही सांगून जाते. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका छोट्या शहरात राहणाऱ्या अंकिताने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. अंकिता इतर सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे जे आयुष्यात यश मिळवण्यासाठी झगडत असतात.

एका छोट्या शहरात जन्मलेल्या अंकिताने यूपीएससीची मन लावून तयारी केली आणि तिच्या दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. अंकिताने आपले प्राथमिक शिक्षण रोहतकमधूनच पूर्ण केले तर पुढे पदवीचे शिक्षण दिल्लीतून करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅज्युएशन दरम्यान अंकिता यूपीएससी ची तयारी करू लागली. पीजीच्या अभ्यासादरम्यानही तिने यूपीएससीची तयारी चालू ठेवली. मात्र, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसली नाही. आपलं पीजीचं शिक्षण पूर्ण करून तिने परीक्षा द्यायला सुरुवात केली.

पण पीजी चालू असतानाच तिच्या आयुष्यात एक असं संकट आलं ज्यामुळे ती आतून पूर्ण खचून गेली. UPSC ची तयारी करत असताना अंकिता चौधरीच्या आईचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आईच्या निधनाने अंकिताला मोठा धक्का बसला आणि ती आतून पूर्ण तुटली. पण अंकिताला तिच्या वडिलांनी खुप सांभाळले आणि प्रोत्साहन दिले. अंकिताचे वडील सत्यवान हे रोहतकच्या साखर कारखान्यात लेखापाल म्हणून तैनात आहेत आणि वडिलांच्या प्रेरणेने अंकिताला आयएएस होण्यास खूप मदत झाली. यानंतर तिने स्वतःला पूर्ण झोकून देऊन आणि प्रचंड मेहनत घेऊन UPSC ची तयारी सुरू केली.

जेव्हा अंकिताने 2017 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली तेव्हा ती नापास झाली. यानंतरही तिने हार मानली नाही आणि तिच्या चुका समजून घेत चुकांचे विश्लेषण केल्यानंतर त्यात सुधारणा करून दुसऱ्या प्रयत्नासाठी अधिक चांगली तयारी केली. अंकिताने 2018 मध्ये दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली. दुसऱ्यांदा तिची रणनीती इतकी प्रभावी होती की तिने भारतात 14 वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी झाली.

पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर तिने अधिक जोमाने यूपीएससीची तयारी सुरू केली. अंकिता पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली तरी तिने हार मानली नाही आणि पुन्हा तयारीला सुरुवात केली ती तिच्या चुकातून शिकत. दुसऱ्या प्रयत्नात तिने देशात 14 वी रँक मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

जे विद्यार्थी UPSC ची तयारी करत आहेत, अंकिता त्यांना सांगते की, अधिक चांगली रणनीती बनवा आणि मनापासून अभ्यास करा. अपयशाला घाबरण्याऐवजी अपयशातूनच शिका. आणि पुढील प्रयत्न अधिक चांगले करा. जर तुम्ही योग्य रणनीती बनवून कठोर परिश्रम केले तर UPSC चे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

About Mamun

Check Also

गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नोकरी सोडून केली UPSC ची तयारी, टॉपर येऊन बनली IAS !

यूपीएससी ही देशातील एक अशी स्पर्धा परीक्षा आहे ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार भाग घेतात. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *