Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केल्यानंतर जेव्हा ती जिवंत असल्याचा सुखद धक्का बसतो..

आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केल्यानंतर जेव्हा ती जिवंत असल्याचा सुखद धक्का बसतो..

आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर कोणावरही दुःखाचा डोंगर कोसळणे साहजिक आहे. आई हे प्रत्येक मुलासाठी सर्वस्व असते. सध्या कोरोनाचा राज्यात हाहाकार सुरु आहे. रोज शेकडो जणांचे प्राण कोरोनाने जात आहेत. अशातच नागपूरच्या अजय मुन आणि कुटुंबाला दुःखाचा आणि सुखाचा धक्का थोड्याच कालावधीत बसला. अजयच्या आईला कोरोना झाला होता. त्यांच्यावर कोविडालय या खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. पण अचानक अजयला आई गेल्याचं रुग्णालयाकडून कळलं.

मुन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी जड अंतकरणाने आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. पूर्ण कुटुंबच दुःखात होतं. पण अंत्यसंस्काराची तयारी झाल्यावर त्यांना एक मोठा धक्का बसला. अजयला आपली आई जिवंत असल्याचे कळले. हे सर्व कसं घडलं जाणून घेऊया.

नागपूरमधील काशीनगर येथे राहणाऱ्या अजय मुन यांच्या ६३ वर्षीय आई आशा मुन यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळले. त्यानंतर त्यांनी आईला ‘गायकवाड-पाटील कोविडालय’ या नागपूरच्या जामठ्यातील खासगी कोविड सेंटरमध्ये भरती केले. आशाबाईंवर येथे उपचार सुरु होते. शुक्रवारी त्यांना तिथे ऍडमिट करण्यात आलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी ८ वाजता रुग्णालयातून फोन आला. आशा मुन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे सांगितले.

हे सर्व ऐकून मुन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजय नातेवाईकांसह कोविडालयात पोहचला. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. तर प्लास्टिक बॅगमध्ये असलेला मृ तदेह घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगण्यात आले. अजयच्या मित्राने घाटावर जाऊन अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली. पूर्ण तयारी झाली होती. मुन कुटुंबीय हॉस्पिटलमधून निघणार होते. पण रुग्णालयाने आशा यांचे दागिने अजयकडे दिले. ते बघून अजयला धक्का बसला. ते दागिने आईचे नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्यानंतर मुन कुटुंबियांनि मृ तदेहाचा चेहरा दाखवण्यास हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. ते बघितल्यानंतर तू आईचा नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसऱ्या एका बॅगमधील मृ तदेह देखील तपासण्यात आला. तो देखील आशाबाईंचा नव्हता. हे बघून अजय हा आई ऍडमिट असलेल्या वॉर्डात धावत गेला. अन त्याला आई बेडवर बसलेली दिसली. त्याच्यासाठी हा मोठा सुखद धक्का होता. आई सुखरूप असल्याचं बघून त्यांनी आईला घरी आणलं. आता त्यांना दुसरीकडे कोरोनावर उपचारासाठी ऍडमिट केलं आहे. नातेवाईकांनी याचा जाब विचारल्यावर हॉस्पिटलमधील बाऊन्सरने सर्व नातेवाईकांना बाहेर काढले.

त्यामुळे अजय मुन यांनी १० एप्रिलला या प्रकरणाची हॉस्पिटलविरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरिन दुर्गे पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी काय चूक केली आणि हा प्रकार कसा घडला, याची चौकशी हिंगणा पोलिसांनी सुरू केली आहे.

खरंतर याविषयी त्या रुग्णालयाकडून माहिती घेतली असता तो जलाबाई रामटेके या महिलांचा मृ तदेह होता. जलाबाईंचं हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी पहाटे निधन झाले. ड्युटीवर असलेल्या नर्सने जलाबाई आणि आशा या शेजारी असलेल्या रुग्णाचे केसपेपर तयार केले. पण ते केसपेपर देताना त्यांच्याकडून आशाबाईंची फाईल दिली गेली आणि मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांची ड्युटी देखील संपली. रुग्णालय प्रशासनाने देखील प्रमाणपत्र बनवलं अन आशाबाईंना फोन करून माहिती दिली.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *