एखाद्या कुटुंबातील सदस्य जेव्हा सरकारी नोकरीला लागतो तेव्हा त्या कुटुंबासाठी ती खूप मोठी गोष्ट असते. खासकरून IAS IPS झालेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी ती खूप अभिमानाची बाब असते. पण एकाच कुटुंबातील ४-४ जण थेट IPS झाले तर ती किती मोठी बाब असेल. हे खरं करून दाखवलं आहे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील अमुदला गावातील एम विष्णू वर्धन राव यांच्या कुटुंबाने.
या कुटुंबातील वडील मुलगा मुलगी जावई असे ४ जण UPSC मधून IPS होत देशसेवा करत आहेत. देशातील हि पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. राव कुटुंबातील १ नाही तर तब्बल ४ जण IPS म्हणून ३ वेगवेगळ्या राज्यात सेवा देत आहेत. यामध्ये स्वतः विष्णू वर्धन राव, त्यांचा मुलगा एम हर्षवर्धन, मुलगी एम दीपिका आणि जावई विक्रांत पाटील यांचा समावेश आहे. चारही जण आज वेगवेगळ्या पदावर सेवा बजावत आहेत.
हे चारही आयपीएस अधिकारी भारतीय पोलीस सेवेतील कर्तृत्ववान पोलीस ऑफिसर म्हणून आज ओळखले जातात. चारही जणांकडे आज मोठा अनुभव आहे. विष्णू वर्धन याना अनेक पदकं देखील मिळाली आहेत. हे ४ ऑफिसर ३ राज्यात सध्या सेवा करत आहेत.
विष्णू वर्धन यांची मुलगी एम दीपिका हि कर्नाटकचे आयपीएस विक्रांत पाटील यांच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघांनी लव्ह मॅरेज केलं. मूळचे कर्नाटक मधील असलेले विक्रांत पाटील हे तामिळनाडू केडर चे अधिकारी आहेत. पण दीपिका सोबत लग्नानंतर ते आंध्र प्रदेश केडर मध्ये गेले आहेत. दीपिका आणि तिच्या भावाने राजस्थान मधून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं होतं.
१० सप्टेंबर १९६१ रोजी जन्मलेल्या एम विष्णू वर्धन राव यांनी बीटेकचं शिक्षण घेतल्यानंतर यूपीएससीमधून IPS पद मिळवलं होतं. ते १९८७ बॅचचे आयपीएस आहेत. ते सध्या झारखंड मध्ये होमगार्डचे डीजी म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांचा मुलगा हर्षवर्धन याचा जन्म ५ जून १९८९ रोजी झाला. हर्षवर्धनने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. तो सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगरचा एसपी म्हणून सेवा बजावत आहे. तो २०१२ च्या बॅचचा आयपीएस आहे.
तर विष्णू वर्धन यांची मुलगी दीपिका २०१४ च्या बॅचची आयपीएस आहे. दीपिकाचा जन्म २७ नोव्हेंबर १९९० साली झाला. तिने देखील बीईचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने यूपीएससी मध्ये यश मिळवलं. दिशा सध्या आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत आहे. दीपिकाचा पती विक्रम पाटील यांचा १२ डिसेंबर १९८७ रोजी झाला. विक्रांतने बीई चं शिक्षण घेतलं असून ते देखील २०१२ बॅचचे आयपीएस आहेत.