Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / एका आयडियाने जीवन बदलले, आज ती कचऱ्यामधून महिन्याला लाखो कमावतेय!

एका आयडियाने जीवन बदलले, आज ती कचऱ्यामधून महिन्याला लाखो कमावतेय!

प्रत्येकाला आयुष्यात एका क्षणाला असं वाटून गेलेलं असतं कि आपला स्वतःचा काही तरी व्यवसाय असावा. काही जण तो करतात आणि त्यात यश देखील मिळवतात पण काहींना मात्र परिस्थितीमुळे ते करणे जमत नाही. मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या आवडीच्या व्यवसायाकडे वळलेले अनेक जण आहेत. असच एक उदाहरण आहे पुण्याची पूजा आपटे बदामीकर.

पुण्याच्या पूजाला इंजिनिअरिंग नंतर मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण ती नोकरी सोडून अशा बिजनेसकडे वळली ज्यामध्ये जायला खूप कमी लोक हिम्मत करू शकता. अक्षरशः कचऱ्याचाच हा बिजनेस होता. पण या कचऱ्यामधून तिने असं काही प्रोडक्ट बनवलं कि ती आज यामधून लाखो रुपये कमावत आहे.

पूजाचा जन्म पुण्यातील एका सामान्य कुटुंबातला. पूजाचा आज स्क्रॅप टायरपासून चप्पल बनवण्याचा व्यवसाय आहे. पूजाचे शिक्षण पुण्यातील अहिल्यादेवी शाळेत झाले. पुढे तिने एसपी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. पूजाने इलेकट्रोनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यातील नामाकिंत सिहंगड इन्स्टिट्यूट मध्ये घेतलं. पूजाला कॉलेज मधेच कॅम्पस प्लेसमेंट देखील मिळाली.

कॅपजेमिनी या मोठ्या कंपनीत तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पूजाने तो जॉब करायला सुरु केलं. पण लहानपणापासून तिला असलेली पर्यावरणाची आवड तिला शांत बसू देत नव्हती. तिने जॉबसोबत आपले शिक्षण देखील सुरु ठेवले होते. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून त्यांना प्लास्टिक, टायर आणि इतर काही विषय प्रकल्पासाठी देण्यात आले होते.

यामधून तिला आयडिया आली कि टायरचा कचरा खूप वाढला आहे. जर टायरपासून आपण काही टिकाऊ रोजच्या जीवनातील गोष्ट बनवली तर खूप फायदा होईल. टायरवर काम करणारे खूप कमी जण असल्याचं तिच्या सुरुवातीला लक्षात आलं. त्यानंतर तिने याविषयी खूप अभ्यास केला. अनेक ठिकाणी तिने भेटी दिल्या. टायरच्या पुनर्वापर बद्दल तिने माहिती जमा करायला सुरु केली.

तिला यामध्ये अनेक लोक भेटले. टायरपासून टाईल्स बनवणारे लोक देखील तिला भेटले. पण तिने अजून काही तरी नवीन बनवायचं ठरवलं होतं. टायरपासून चप्पल बनवण्याचा तिने निर्णय घेतला. तिने यासाठी अगोदर आपल्या आजूबाजूच्या १५-२० चांभारांची भेट घेतली. त्यावेळी तिला सर्वानी असं शक्य नसल्याचं सांगत येड्यात काढलं. पण एक कारागीर तिला असा मिळाला जो म्हणाला या तुम्ही टायर घेऊन आपण ट्राय करू.

त्यानंतर ती टायर शोधत फिरली. नंतर लक्षात आलं कि टायरमध्ये स्टील गॉज असल्याने ते वापरता येणार नाहीत. पण ट्रक टायरमध्ये स्टील गॉज नसल्याचं समजलं आणि ते वापरायचं ठरलं. तिने एका गॅरेजमधून एक ट्रकचं टायर आणलं आणि ते कापून सुरुवातीला एक चप्पल बनवून बघितली. नंतर त्यांना चप्पल बनवणं शक्य असल्याचा कॉन्फिडन्स आला.

पूजाचा नेमिताल हा ब्रँड या उत्पादनाला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेला आहे. यातून त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा वसा तर घेतलाच आहे; पण छोट्या कारागिरांना रोजगारही दिला आहे. हे उत्पादन यशस्वी ठरण्यामागे त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. पूजा आज या व्यवसायातून लाखो रुपये कमावत आहे. पूजाला या व्यवसायात तिचे पती आणि सासरे यांनी खूप मदत केली. तुमच्याकडे देखील अशी काही नवीन आयडिया असेल तर त्यावर तुम्ही ठाम राहून काम केलं तर यश नक्कीच मिळतं.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *