Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / एकेकाळी १० हजाराची नोकरी मिळत नव्हती, आज युट्युब मधून महिन्याला २ लाख कमावते..

एकेकाळी १० हजाराची नोकरी मिळत नव्हती, आज युट्युब मधून महिन्याला २ लाख कमावते..

अनेक स्त्रिया या गृहिणी बनून आपलं घर सांभाळत असतात. अनेकदा यामुळे त्या स्वतःला कमी समजतात. आपण काही कमवत नाही असा त्यांचा समज असतो. पण खरंतर स्त्री हि चांगल्या प्रकारे घर सांभाळते म्हणूनच एखाद्या कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालू असतो. स्त्रियांनी घर सांभाळताना स्वतःला अक्टिव्ह ठेवायला हवं. घरी राहून काही नवीन गोष्टी शिकायला हव्यात. आपल्याला नाव ठेवणारी अनेकजण भेटतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. कारण ती नावं ठेवणारी माणसं आयुष्यात काही करू शकलेली नसतात. आज अशाच एका महिलेला भेटणार आहोत जिने हे सर्व आयुष्यात झेललं आणि आपल्या कामावर विश्वास ठेवून आज यश मिळवलं आहे. हि महिला एकेकाळी १० हजार रुपये महिन्याची नोकरी भेटावी म्हणून झगडत होती तीच आज घरून महिन्याला २ लाख रुपये कमावते.

या महिलेचं नाव आहे सरिता पद्मन. आपण सरिताच्या यशोगाथा बघताना तिच्या बालपणापासूनच सुरुवात करूया. कारण तिने बालपणापासूनच अनेक संकटं झेलली. सरिताच्या घरी तिच्या जन्माआधी खूप चांगलं होतं. आजोबाना खूप जमीन होती. त्यांचं किराणा दुकान आणि एक हॉटेल होतं. पण पुढे व्यवसायात आलेल्या अडचणींमधून जमीन विकावी लागली सोबतच हॉटेलही बंद झालं. ते जुन्या काळात लखपती होते. सरिताच्या जन्म झाला तेव्हा जेमतेम परिस्थिती होती. कुटुंब मोठं असल्याने दुकानावर सर्व भागत नव्हतं. त्यामुळे सरिताचे आईवडील आईच माहेर असलेल्या सांगोल्याला राहायला गेले. तिथं भाड्याने छोटं घर घेतलं आणि किराणा दुकान देखील वडिलांनी सुरु केलं.

पहिले ३-४ वर्ष त्यांचं सर्व काही सुखात चाललं. पण वडिलांच्या स्वभावामुळे ते कर्जबाजारी झाले. कारण त्यांनी दुकानात खूप उधार वाटलं. कर्जाच्या टेन्शनमध्ये वडिलांचं व्यसन वाढलं. वडील खूप आजारी पडले. आई अगदी तिसरी शिकलेली होती. वडिलांना ब्लड कँसर असल्याचं निदान झालं. दुकान बंद पडलं. आईने बाहेर जाऊन स्वयंपाकाची काम केली. लास्ट स्टेजला असल्याने उपचाराचा फायदा नव्हता. फक्त हजार रुपयांसाठी तिला लोकांनी मंगळसूत्र गहाण ठेवायला सांगितलं. सरिता हे आईवडिलांचे दुःख बघतच लहानाची मोठी होत होती. पुढे वडिलांना बार्शीला उपचाराला नेलं. ज्या दिवशी वडील येणार होते त्यादिवशी आजीने सरिताला शाळेतून लवकर बोलावलं. ती आली तेव्हा घरासमोर गर्दी होती. वडील गेले होते.

दुःखाचा डोंगर कोसळला होता. १०-१२ दिवसांनी आईने पुन्हा काम सुरु केलं. लोकांनी सपोर्ट तर केला नाही पण नावं ठेवले. ४ मुलींचं शिक्षण तिने दिवस रात्र काम करून पूर्ण केलं. सरिता हुशार होती. तिला न्यूज अँकर बनण्याची आवड होती. वक्तृत्व खूप चांगलं होतं तिचं. मुलींचे लग्न लवकर करा म्हणून नातेवाईक घाई करू लागले. पण आईने सरिताच्या शिक्षणाला सपोर्ट केला. पुढे त्यांना होस्टेलचे ४० डब्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. सरिता आणि आई ते डब्बे बनवायच्या. आईला बघत बघत त्या देखील स्वयंपाकात चांगल्या ट्रेन झाल्या.

सरिताला एवढी प्रॅक्टिस झाली कि ती एकटी पुढे स्वयंपाक करायला लागली. तिने ग्रॅज्युएशन झाल्यावर पुण्यात डिवाय पाटील कॉलेजला एमसीएला ऍडमिशन घेतलं. तिने एजुकेशन लोन घेऊन शिक्षण घेतलं. तिच्या मनात खूप निगेटिव्ह विचार यायचे. त्यामुळे तिने ऍडमिशन देखील कॅन्सल केलं. काकांकडे राहून छोटी मोठी नोकरी करू लागली. तिने ३ हजाराची नोकरी केली. पुढे आई पण पुण्यात आली. भाड्याने रूम करून राहू लागले. तिचा छोटा ऍक्सीडेन्ट झाल्याने तो लांबचा जॉब सोडावा लागला.

तिने मोठ्या कंपनीत मुलाखत दिली आणि जॉब मिळवला तो हि इन्फोसिस कंपनीत. महिन्याला दहा हजार पगार मिळणार होता. आई खूप खुश झाली. दीड वर्षातच तिला यूकेला पाठवलं गेलं. स्कॉटलंड मध्ये ती गेली. स्वतःच्या हिमतीवर तिने हे सर्व केलं होतं. तिकडून आल्यावर ती ट्रेनर बनली. ग्रोथ खूप फास्ट होत गेली. २०१० मध्ये तिचं लग्न ठरलं ते एका फौजीसोबत. तिचे पती हे इंडियन नेव्ही मध्ये आहेत. पुढे लग्नानंतर जॉब सोडला.

सारखी वेगवेगळ्या जागी पोस्टिंग होत होती. इन्फोसिस मध्ये २५ हजार पगार असलेल्या सरिताच्या एका शोरूम मध्ये ५ हजाराचा जॉब केला. तिला काही तरी करायचं होतं. पुढे मुलगा झाला. तिला अनेक अडचणी येत होत्या. तिला एकटीला सर्व करावं लागत होतं. पण तिने हार न मानता सर्व केलं. पुढे शेवटची पोस्टिंग अंदमानला झाली. तिथंही लहान मुलांना ती शिकवू लागली. तिच्या पतींनी रिटायरमेंट घेतली आणि पुण्यात आले. पतींनी पुन्हा करिअर करण्यास सांगितले.

तिने बऱ्याच ठिकाणी इंटरव्हिव्ह दिले पण तिला कुठेच नोकरी मिळत नव्हती. अखेर मोठ्या कंपनीत जॉब मिळाला. ती जॉब आणि मिस्टर घरकाम करायचे. मुलाला आईला सोडून राहणे शक्य होत नव्हते म्हणून तिने कोणालाही न विचारता नोकरी सोडली. पतींनी नंतर नोकरी केली. तिने त्याच दरम्यान फूड ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. चांगल्या ऑर्डर मिळत होत्या. दोघे पती पत्नी नंतर शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. पुढे बहिणीने युट्युब चॅनेल सुरु करण्याची आयडिया दिली आणि सर्व शिकवलं.

तिने ५-६ व्हिडीओ पोस्ट केले. गणपतीच्या दिवस असल्याने मोदकाचा व्हिडीओ व्हायरल झाला. तिचे स्बस्क्रायबर फास्ट वाढत गेले. ३ दिवसात १ हजार आणि ४ महिन्यात १० हजार स्बस्क्रायबर झाले. तिने नंतर प्रेग्नन्सी मुळे जॉब सोडला. पूर्णवेळ युट्युबवर काम केलं. दिवाळीनंतर तीच पहिलं पेयमेन्ट युट्युब कडून आलं ते होतं पाऊणे दोन लाख रुपये. दीड महिन्यात तिने हा पहिला पगार कमावला होता. वर्षभर दीड लाख साठी झटणारी सरिता महिन्यात १.५-२ लाख कमवायला लागली. आज तिचं चॅनेल खूप मोठं झालं असून तिचे जवळपास ८ लाख स्बस्क्रायबर आहेत. ती आज अनेक स्त्रियांसाठी प्रेरणास्रोत आहे.

About Mamun

Check Also

गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नोकरी सोडून केली UPSC ची तयारी, टॉपर येऊन बनली IAS !

यूपीएससी ही देशातील एक अशी स्पर्धा परीक्षा आहे ज्यात दरवर्षी लाखो उमेदवार भाग घेतात. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *