बॉलिवूड आणि प्रेमकहाणी हे समीकरण तसं जुनंच आहे. पण यात बॉलिवूडच्या राजकारण आणि खेळाडूंशी प्रेमकहाण्या देखील नवीन नाहीत. आजपर्यंत अशा अनेक प्रेमकहाण्या आपण बघितल्या असतील ज्या काही पूर्ण झाल्या तर काही अपूर्ण राहिल्या.
प्रेमकहाणी अपूर्ण राहिलेल्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेचा देखील समावेश आहे. सोनालीची प्रेमकहाणी हि राजकारणी व्यक्तीसोबत होती. ९० च्या दशकात सोनाली बेंद्रेची खूप हवा होती. सोनाली त्या दशकात लाखो हृदयावर अधिराज्य गाजवत होती. तिचे तेव्हा लाखो चाहते होते.
सोनालीच्या चाहत्यांच्या यादीत एक खूप मोठं नाव होतं. ते नाव म्हणजे देशातील दिग्गज ठाकरे घराण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. राज ठाकरे हे देशातील राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेलं एक नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे असलेल्या राज याना बाळासाहेबांची सावली म्हणून बघितले जाते. त्यांचा राजकीय प्रवास खूप चढउतारांचा राहिला आहे.
९० च्या दशकात सुरु झाली प्रेमकहाणी-
राज ठाकरे हे शिवसेनेत असताना त्या काळी सोनाली बेंद्रेच्या प्रेमात पडले होते. राज हे बाळासाहेबांसोबत खूपच जवळीक ठेवून असायचे. राज यांची शैली हुबेहूब बाळासाहेबांसारखी होती. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून बघितले जाऊ लागले.
पण त्यांच्या आयुष्यात एक वेगळे वळण आले आणि त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. राज यांचे राज्यात स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न आहे जे अजून अपूर्ण आहे. या स्वप्नासोबत त्यांच्या आयुष्यात ती एक गोष्ट देखील अपूर्ण राहिली होती.
९० च्या दशकात जेव्हा बॉलिवूडमध्ये कलाकारांनी मनोरंजनाला एका वेगळ्या उंचीवर नेलं होतं तेव्हा बाळासाहेबांचं मुंबई आणि राज्यात खूप वलय होतं. त्यावेळी सोनालीने नुकतीच तिच्या करिअरची सुरुवात केली होती. सोनाली तिच्या करिअर मध्ये जसं जसं यश मिळवत गेली तसं तिच्या राज ठाकरेंसोबत अफेअरच्या चर्चा वाढल्या. राज ठाकरे सोनालीमुळे खूप इम्प्रेस झाले होते.
सोनालीला देखील राज ठाकरे आवडायला लागले होते. असं पण म्हंटल जात कि सोनालीला राज यांच्यामुळेच बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता. या अफेअरचे किस्से १९९६ मध्ये मायकल जॅक्शन भारतात आले होते तेव्हा जास्त समोर आले. राज आणि सोनाली यांनी मिळून मायकलचे विमानतळावर स्वागत केले होते. दोघांचं प्रेम एवढं बहरायला लागलं होत कि ते लग्न करतील अशा बातम्या येत होत्या. पण बाळासाहेबांमुळे या प्रेमकहाणीला ब्रेक लागला.
या कारणामुळे अधुरी राहिली प्रेमकहाणी-
राज आणि सोनालीच्या अफेअरची माहिती तेव्हा बाळासाहेबांना समजली. त्यांनी राज यांना मातोश्रीवर बोलावून घेतले. बाळासाहेबांनी त्यांना समजावलं कि ते पक्षातील एक प्रमुख चेहरा आहेत. आणि अगोदरच त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी काही चुकीचं पाऊल उचललं तर स्वतःचा संसार पण मोडेल आणि पक्षाची प्रतिमा पण खराब होईल.
यामुळे राज यांची स्वतःची इमेज पण खूप खराब होईल असं बाळासाहेबांनी त्यांना समजावले. शिवसेनेत त्यांचं मोठं स्थान असल्याने राज यांनी सोनालीसोबत लग्नाच्या गोष्टीपासून ब्रेक घेतला. तरीही त्यांचे अफेअर अनेक दिवस चालल्याचं बोललं जात. राज बाळासाहेबांना खूप मानायचे म्हणून त्यांनी त्यांचा सल्ला ऐकून सोनालीपासून दूर जाणे पसंत केले.