Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / एकेदिवशी पोलिसांनी उचलून नेऊन खोटी केस केली त्यादिवशीच त्यानं ठरवलं IPS व्हायचं!

एकेदिवशी पोलिसांनी उचलून नेऊन खोटी केस केली त्यादिवशीच त्यानं ठरवलं IPS व्हायचं!

आज एक असा IPS आपल्या महाराष्ट्रात सेवा करत आहे ज्याने लहानपणी मोठा संघर्ष केला. पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीचा त्रास त्याला झेलावा लागला. तो अशा परिसरातून आला जिथे UPSC ची परीक्षा म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं. पण त्याने UPSC करण्याचं ठरवलं तर अनेकांनी त्याची टिंगल उडवली. पण त्याने मात्र त्या सर्व गोष्टी आपल्या डायरीत टिपून ठेवल्या. आपल्या कामातूनच सर्वाना उत्तर द्यायचं अशी गाठ मनाशी बांधली. अन एका खेडेगावात शेती करणारा तो मुलगा आयपीएस झाला. जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास..

तो मुलगा त्यावेळी बारावीत शिक्षण घेत होता. वडील DySP होते त्यामुळे घरी शैक्षणिक वातावरण चांगलंच होतं. तो देखील खूप हुशार विद्यार्थी होता. पण १२ विच्या परीक्षा २ महिन्यावर आल्या असताना त्याच्या आयुष्यात एक घटना घडली ज्यामुळे त्याचं आयुष्य बदलून गेलं. त्याचा घरी बसून बारावीचा अभ्यास सुरु होता. वडिलांची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी होती. घरी फक्त मोठी बहीण आणि तो होता. अभ्यास करताना खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. दिसलं कि काही तरी तिथं काम चालू आहे.

सार्वजनिक जागेवर एक विहीर होती. त्या ठिकाणी कोणी तरी भिंत बांधून कंपाऊंड करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तो तात्काळ अभ्यास सोडून तिथं गेला. शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणार व्यक्ती हे अनधिकृत कंपाउंड करत होता. या मुलाने वाद घातला आणि ते काम थांबवलं. तेव्हा तिथे SP, DySP आले त्यांनी त्या मुलाला समजावून सांगितलं पण तो काही ऐकत नव्हता. भिंत बांधली तर मी इथे झोपणार म्हणून विरोध केला. अखेर ते काम थांबलं आणि मजूर निघून गेले.

या घटनेच्या १५ दिवसानंतर अभ्यास करून कंटाळा आल्याने हा मुलगा थोडा वेळ क्रिकेट खेळायला गेला. त्याचवेळी ग्राउंडवर पोलिसांची गाडी आली आणि त्या मुलाला जवळ बोलवलं. मुलाला वाटले आपले वडील पोलीस आहेत तर त्यासाठी काही विचारण्यास बोलवले असेल. पण त्यांनी थेट जीपमध्ये बसवलं अन घेऊन गेले. पोलिसांनी त्या मुलाला त्रास द्यायला सुरु केला. रात्रभर कोठडीत ठेवले. वेगवेगळ्या घटना सांगितल्या आणि त्यात तुझा काय हात आहे असे विचारले.

त्या मुलाने वडील DySP असल्याचे सांगितले पण पोलिसांनी काही ऐकलं नाही. पोलिसी खाक्या दाखवू म्हणून धमकावलं. अन आम्ही जे सांगू ते स्वीकार कर असे सांगितले. पण मुलाने कॅमेऱ्यासमोर काहीच सांगितलं नाही. रात्रभर त्रास झेलला. बहिणीने वडिलांना लँडलाईन वरून कॉल केला. त्यावेळी फोन नव्हते. वडील आले आणि त्यांना घरी घेऊन गेले. तो खूप रागात होता. पण वडिलांनी समजावलं अन गावी पाठवलं. तिथे जाऊन शेती केली. वर्षभर शेती केली. दुसऱ्या वर्षी ठरवलं कि आता आयपीएस बनूनच त्या घटनेचा बदला घ्यायचा. तो मुलगा आज आयपीएस असून त्याचं नाव आहे IPS कृष्ण प्रकाश.

झारखंडच्या हजारीबाग मध्ये कोरंबाई या छोट्याशा गावात कृष्ण प्रकाश यांचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. शाळा एकदम साधारण होती. नंतर हजारीबागला प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून शहरात आल्यामुळे त्यांना शिक्षण थोडे जड गेले. १२ वी चे शिक्षण घेतले नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आयुष्यात घडलेल्या त्या घटनेमुळे UPSC करण्याचं ठरवलं. कॉलेज चालू असतानाच सामाजिक कार्य देखील सुरु होतं. एका स्थानिक पेपरसोबत देखील काम केलं.

१९९५ मध्ये कृष्णप्रकाश यांनी यूपीएससी देण्याचं ठरवलं. २ परीक्षेत त्यांना यश आलं मात्र दोन्ही वेळेस ते मुलाखतीत कमी पडले. पुन्हा तिसऱ्यांदा परीक्षा पास झाले. मुलाखतीत विचारलं कि शिल्लक मार्क हवे. ते म्हणाले माझ्या हक्काचे जे असतील त्यात एकही कमी नको अन एकही शिल्लक नको. २७५ पैकी १९८ मार्क घेऊन पास झाले अन IPS बनले. १९९८ बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. आज ते पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून काम बघत आहेत.

कृष्णप्रकाश यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, मालेगाव, अमरावती, नगर आणि दक्षिण मुंबईत देखील सेवा केली आहे. ते कुठेही गेले कि तिथं कोणत्या एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा त्रास होणार नाही याची काळजी घेतात. अन असं एखाद्याने केलं तर त्याला शिक्षा देतात. कृष्णप्रकाश यांच्या पत्नी संजना या वडिलांच्या मित्राची मुलगी आहेत. त्या एका राजघराण्यातील आहेत. वडिलांनी लहानपणीच हि सून करायची ठरवलं होतं. कृष्णप्रकाश यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. त्यांना आज आयर्नमॅन म्हणून ओळखले जाते.

कृष्णप्रकाश यांनी २०१७ मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन हा जगातील सर्वात आव्हानात्मक एक दिवसीय खेळ प्रकार पूर्ण केला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाला ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटरची सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावावं लागतं. हे सर्व केवळ १६ ते १७ तासांच्या कालावधीत पूर्ण करायचं असतं. ची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. अशी नोंद होणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी आज राज्यासह देशात प्रसिद्ध आहेत.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *