महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाव आज सर्वांच्या परिचयाचे आहे. नागपूर येथील एका राजकीय प्राश्वभूमी असलेल्या कुटुंबात देवेंद्र फडणवीसांचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधरराव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघात होते. ते विधान परिषदेचे सदस्य होते. तर त्यांच्या चुलती शोभा फडणवीस या राज्याच्या माजी मंत्री राहिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अमृता फडणवीस यांच्याशी प्रेमविवाह केला. त्या दोघांची भेट खुप खास होती. एका मित्राच्या घरी झालेल्या भेटीतून दोघांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. देवेंद्र यांनी अमृताला पहिल्याच भेटीला तुम्ही काजोल सारख्या दिसता असं म्हंटलं होतं. पहिल्याच भेटीत त्यांनी लग्नाचा विचार मनात आणला होता.
अमृता फडणवीस यांचा जीवनप्रवास-
अमृता फडणवीस यांचा जन्म नागपूरचाच. त्यांनी संगीत क्षेत्रात सध्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कार्यात देखील त्या अग्रेसर असतात. अमृता फडणवीस आज एक बँकर देखील आहेत. त्या ऍक्सिस बँकेत ट्रान्स्फर बँकिंगच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. ९ एप्रिल १९७९ रोजी जन्मलेल्या अमृता यांचे माहेरचे नाव अमृता रानडे.
त्या नागपूरचे प्रसिद्ध डॉ शरद रानडे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ चारुलता रानडे यांच्या कन्या आहेत. आई वडील डॉ असल्याने त्यांचं बालपण आणि कॉलेज आयुष्य हे स्वातंत्र्यात गेलं. अमृता यांचं सुरुवातीचं शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेतून झालं. नंतर नागपूरमध्येच जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये त्यांनी पदवी घेतली. पुढे अर्थशास्त्र मध्ये MBA केले. यासोबत त्यांनी सिम्बॉयसिस लॉ स्कुल येथून करपात्र कायद्याचा अभ्यास केला.
शाळेत असताना अमृता रानडे या क्रिडा स्पर्धांमध्ये देखील खूप भाग घ्यायच्या. टेनिस मध्ये तर त्या राज्य स्तरावर पोहचलेल्या खेळाडू होत्या. त्या अंडर १६ टेनिस खेळाडू म्हणून राज्य पातळीवर खेळल्या आहेत. याशिवाय शास्त्रीय गायन मध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतले आहे. आज त्यांचे अनेक मोठे गाणे मोठ्या संगीत कंपन्यांबरोबर येत असतात.
अमृता रानडे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिली भेट एका मित्राच्या घरी झाली. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचं ठरवलं. डिसेंबर २००५ मध्ये अमृता आणि देवेंद्र यांनी लग्न केलं. त्यावेळी देवेंद्र यांची आमदारकीची दुसरी टर्म चालू होती. त्यांना देविजा नावाची मुलगी देखील आहे. नागपूरच्या प्रसिद्ध फुटाला तलावाच्या किनाऱ्यावर बॉटनिकल गार्डन मध्ये त्यांचा विवाह झाला होता.
त्यांच्या लग्नाची चर्चा देखील संपूर्ण नागपूरमध्ये झाली होती. या लग्नाला झोपडपट्टीतील अनेक लोकांना आमंत्रित केलं होतं. देवेंद्र फडणवीस याना अभिनेत्री काजल खूप आवडते. त्यांनी अमृताना तुम्ही काजोल सारख्या दिसता म्हणून प्रपोज केला होता.