एक काळ होता जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या प्रेमाच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात व्हायच्या. सर्वत्र त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा असायची. पण त्यांचं नातं काही कारणांमुळे तुटले. ते नातं तेव्हा तुटलं नसतं तर आज ते दोघे पती पत्नी राहिले असते. या नात्यात कटुता येण्यास ऐश्वर्या रायची एक अट कारणीभूत ठरली असे सांगितले जाते. जेव्हा दोघे वेगळे झाले तेव्हा देखील त्यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली होती.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक १९९९ साली आलेल्या हम दिल दे चुके सनम या सिनेमापासून वाढली. या सिनेमात दिग्गज अभिनेता अजय देवगणची देखील भूमिका होती. यात सिनेमात सोबत काम करताना ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात पडले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमापासून त्यांची देखील लव्हस्टोरी सुरु झाली.
पुढे २००२ मध्ये सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या फेव्हरेट जोडीच्या नात्यात असं काही होईल असं चाहत्यांना बिलकुल वाटत नव्हतं. चाहत्यांना अनेक दिवस या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता कि सलमान-ऐश्वर्या वेगवेगळे झालेत. त्यांच्या नात्यात कटुता येण्याचे अनेक कारणं समोर आले.
पण एक कारण असं होतं जे या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचे म्हंटले जाते. ते कारण होते ऐश्वर्याने सलमान समोर ठेवलेली अट. ऐश्वर्या आणि सलमान दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर होते. सलमान ऐश्वर्यासोबत लग्न देखील करणार होता. ऐश्वर्या देखील त्याच्यासोबत सात फेरे घेऊ इच्छित होती. पण तिने सलमानला सांगितले कि त्याने लग्नानंतर आपल्या कुटुंबाला सोडावे आणि सलमानने लग्नानंतर आपल्या कुटुंबाच्या आणि भावांच्या कोणत्याच प्रोजेक्टमध्ये पैसे लावू नये.
ऐश्वर्याच्या या अटीने सलमान खूप नाराज झाला होता. त्याच्या मनाला हि गोष्ट खूप खटकली. कारण सलमान आपल्या कुटुंबाशी खूप जोडलेला होता. त्याचे कुटुंबावरील प्रेम सर्वश्रुत होते. तो आजही आपल्या कुटुंबासोबत राहतो. ऐश्वर्याच्या याच गोष्टीमुळे दोघांच्या नात्यात कटुता यायला सुरुवात झाली. याच गोष्टींमुळे त्यांचं नातं लवकरच तुटलं.
याशिवाय सलमान ऐश्वर्याच्या नाते तुटण्याची अनेक कारणं आतापर्यंत समोर आली आहेत. सलमानचा राग देखील नाते तुटण्याचे कारण सांगितले जाते. ऐश्वर्या पुढे बच्चन कुटुंबाची सून बनली. आज ती बच्चन कुटुंबात सुखी असून बॉलिवूडपासून दूर आहे. ऐश्वर्याचा शेवटचा सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’ २०१६ मध्ये आला होता. यामध्ये रणवीर कपूर आणि अनुष्का शर्माची भूमिका होती.
तर सलमान खान आजही बिना लग्नाचा आहे. सलमानचे अनेक हिट सिनेमे बघायला मिळाले. सध्या त्याचे चाहते राधे या त्याच्या मोठ्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.