Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / केबल ऑपरेटरसोबत केलं होतं तिने लग्न, अंध असूनही कलेक्टर होत घेतला रेल्वेचा बदला..

केबल ऑपरेटरसोबत केलं होतं तिने लग्न, अंध असूनही कलेक्टर होत घेतला रेल्वेचा बदला..

आयुष्यात आपलं ध्येय आपल्याला माहिती असेल आणि ते मिळवण्यासाठी जिद्द, परिश्रम करण्याची तयारी असेल तर ते ध्येय सहजरीच्या पूर्ण केलं जाऊ शकतं. हिंमत, विश्वास आणि निर्धार असला तर शारीरिक अक्षमतेवर देखील मात करून यश मिळवता येतं. हेच दाखवून दिले आहे महाराष्ट्राच्या एका लेकीने. अंध असूनही तिने भारतातील पहिली अंध IAS होण्याचा मान मिळवला आहे. हि महाराष्ट्राची लेक मोठा संघर्ष करून कलेक्टर पदापर्यंत पोहचली. जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास..

उल्हासनगरची रहिवाशी असलेली हि लेक आहे प्रांजल पाटील. प्रांजल पाटील हि मूळची जळगावची. जळगावमध्येच तिचं शालेय शिक्षण सुरु होतं. अभ्यासात हुशार असलेल्या प्रांजलच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. ते संकट तिच्या वर्गातल्या एका मैत्रिणीमुळे आले. प्रांजल ६ वर्षाची असताना तिच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने तिच्या डोळ्यात पेन्सिल मारली. त्यानंतर तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पूर्णच दृष्टी गेल्याने तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी मुंबईच्या दादर येथील कमला मेहता शाळेत घातलं. त्या शाळेत ब्रेल लिपीमध्ये शिकवलं जायचं.

दहावीपर्यंत त्याच शाळेत शिक्षण घेतल्यानंतर प्रांजलने चंदाबाई कॉलेजमध्ये १२ वि आर्ट चे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात खूप हुशार असलेल्या प्रांजलने १२ वित ८५ टक्के मार्क मिळवले. त्यानंतर तिने बीएसाठी त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजला प्रवेश घेतला. झेव्हीयर मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रांजलने दिल्लीच्या जेएनयू मध्ये मास्टरच्या डिग्रीला प्रवेश घेतला.

दरम्यान पदवीचे शिक्षण झाल्यावर प्रांजल आणि तिच्या एका मित्राने UPSC संदर्भात एक लेख वाचला होता. तिला UPSC ची आवड निर्माण झाली ती तेव्हापासूनच. तिने त्याच दिवशी स्वप्न बघितलं ते कलेक्टर होण्याचं. पण तिने हे स्वप्न कोणालाही सांगितलं नाही. जेएनयू मध्ये एमए चं शिक्षण पूर्ण केलं. प्रांजलने जॉब ऍक्सेस विथ स्पीच या सॉफ्टवेअरचा वापर करून शिक्षण सुरु ठेवलं. प्रांजलने UPSC खूप मेहनतीने तयारी केली.

त्याच दरम्यान प्रांजलने २०१५ मध्ये केबल ऑपरेटर असलेल्या कोमलसिंह पाटील यांच्याशी विवाह केला. कोमलसिंह यांच्याशी लग्न करण्याआधी त्यांनी त्यांना एक अट घातली होती. लग्न झाल्यावर शिक्षण सोडणार नाही, अशी अट त्यांनी विवाहाआधी घातली होती. लग्नानंतर यूपीएससीची तयारी सुरु ठेवली. कुठल्याही क्लास शिवाय तयारी सुरु होती.

शारीरिक विकलांग कोट्यातून प्रांजलने यूपीएससीची परीक्षा दिली. प्रांजल २०१६ मध्ये पहिल्या प्रयत्नातच यूपीएसी उत्तीर्ण झाल्या. त्यांना ७७३ वी रँक मिळाली. त्यांना भारतीय रेल्वे लेखा सेवेत (आयआरएएस) पाठवण्यात आले, पण रेल्वेने दृष्टिहीनतेमुळे त्यांना नोकरी देण्यास नकार दिला. आधीच अंधत्व आणि परीक्षा पास होऊनही तिला हक्काची पोस्टिंग मिळत नव्हती. तिने याविरुद्ध लढा सुरु केला.

रेल्वे विभागाविरुद्ध लढा लढताना तिने यूपीएससीची तयारी देखील सुरु ठेवली. आणि त्याचे फळ तिला २०१७ मधेच मिळाले. २०१७ च्या परीक्षेत प्रांजलने देशात १२४ वि रँक मिळवत IAS पदाला गवसणी घातली. त्यानंतर प्रांजलने नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मसुरी येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केलं. २ वर्षाच्या प्रशिक्षणानंतर प्रांजलने बघितलेले स्वप्न सत्यात उतरले. प्रांजळ रेल्वे विभागाच्या नाकावर टिच्चून कलेक्टर झाली.

देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी म्हणून प्रांजल पाटील याना आज ओळखलं जातं. या मराठमोळ्या प्रांजलची पहिली पोस्टिंग तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. प्रांजल कडून आजच्या पिढीतील युवकांना शिकण्यासारखे खूप काही आहे. तुमच्याकडे फक्त जिद्द हवी हेच प्रांजलने दाखवून दिलं आहे. प्रांजलच्या या कामगिरीस सलाम.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *