सध्या कोरोनाने देशात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. भारतातील कोरोना रुग्णांचे आकड्यांमध्ये रोज रेकॉर्डब्रेक वाढ होताना दिसत आहे. हजारो लोकांचे प्राण देखील रोज जात आहेत. कोरोना पासून बचाव करायचा असेल तर स्वताची काळजी घेणे हा एकमेव उपाय सध्या आहे. कोरोना पॉसिटीव्ह आल्यानंतर देखील घाबरून न जाता याचा सामना केल्यास रुग्ण बरा होतो. फक्त वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. अनेकदा अशा चुका झाल्याचे दिसत आहे कि लोक अंगावर दुखणं काढत आहेत आणि नंतर रुग्णालयात गेल्यावर उशीर झालेला असतो. त्यामुळे थोडेही काही लक्षणं असतील तर लवकर टेस्ट करून योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
कोरोनामध्ये सध्या चुकीच्या गोळ्या औषधी घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पॉसिटीव्ह आल्यानंतर पेनकिलर आणि अँटिबायोटिक्स गोळ्या घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कुठल्याही डॉक्टरकडून योग्य माहिती न घेता या गोळ्या घेणे महागात पडू शकते. कोरोना रुग्ण अनेक अशा चुका करतात ज्या त्यांनी टाळायला हव्या. जाणून घेऊया काय आहेत या चुका..
१. डॉक्टर आणि तज्ञांच्या मते कोरोनावर अजूनही खात्रीशीर उपाय असणारे औषध सापडलेले नाहीये. सध्या कोरोनावर जे उपचार केले जात आहेत त्यामध्ये डॉक्टर रुग्णांच्या लक्षणांना कंट्रोल करणारे उपचार करत आहेत. कोरोनाचे थोडे देखील लक्षण असतील तर स्वताला घरातील सदस्यांपासून वेगळ ठेवणं आवश्यक आहे. किमात ७ दिवस तरी आयसोलेशन मध्ये राहणे गरजेचे आहे.
२. कोरोना संकटात त्याच रुग्णांनी दवाखान्यात जायला हव ज्यांना जाणं खूपच गरजेचं आहे. वृद्ध आणि इतर काही आजारांच्या सामना करणाऱ्या रुग्णांनी रुग्णालयात जायला हवं पण जे रुग्ण गरज नसताना घाबरून जाऊन रुग्णालयात जातात त्यांनी ते टाळायला हवं.
३. जे रुग्ण घरीच आयसोलेशन मध्ये आहेत त्यांनी डॉक्टर च्या सल्ल्याशिवाय पेरासिटामोल आणि इबुप्रोफेन या सर्दी डोकेदुखी पासून आराम देणाऱ्या गोळ्या आणि पेनकिलर घेऊ नयेत. पेरासिटामोल आणि इबुप्रोफेन जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व गोळ्या घ्या.
४. जर तुम्हाला खोकला येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला न घेता खोकल्याचे सिरप घेणे देखील टाळणे खूप आवश्यक आहे. गळ्यात खरखर असेल तर मध आणि लिंबू कोमट पाण्यात घेऊन तुम्ही त्यापासून गुळण्या करू शकता.
५. अँटिबायोटिक्स गोळ्यांपासून कोरोनावर इलाज करणे टाळा. या गोळ्या कोरोनावर इलाज असणाऱ्या खातीशीर औषधी नाहीयेत. त्यासाठी डॉक्टर जे सांगतील त्याच गोळ्या घ्या. बऱ्याचदा असं होतं कि कोणी तरी ओळखीतला सांगतो मी या गोळ्या घेतल्या आणि मला फरक पडला. तर असे ऐकून आपण त्या गोळ्या घेणे टाळा.
६. हात सॅनिटाईज करण्यासाठी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अल्कोहोल असलेले सॅनिटाइजरच वापरा. कारण ६० टक्के पेक्षा कमी अल्कोहोल असलेले सॅनिटाइजर वायरस नष्ट करू शकत नाहीत.
७. अनेकदा असं पण होत कि आपण कुणाच्या तरी सांगण्यावरून घरीच आयुर्वेदिक उपचार घेण्याचा प्रयत्न करतो. कारण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहेत ज्यामध्ये कोरोनाचे आयुर्वेदिक उपचार सांगितले जात आहेत. यापासून दूर राहायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर काहीही ट्राय करून बघू नये.
८. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. कोरोना रुग्णाने याचे ध्यान ठेवणे आवश्यक आहे. पाणी आणि फायबर जास्त प्रमाणात शरीरात असणं गरजेचं आहे. त्यामुळे पाणी जास्त प्या.
कोरोना रुग्णांना लसूण हा फायदेशीर ठरू शकतो. जुन्या काळात लसूण, अद्रक आणि हळदीचा वापर करून अनेक आजारांवर मात केलेली आपण ऐकलेलं आहे. लसूण मध्ये असलेला एलिसीन हा तत्व आपल्या रोगप्रतिकारक पेशी (इम्यून सेल्स) मजबूत करतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता. लसूणचा जास्त वापर देखील केला नाही पाहिजे. तुम्हाला हि माहिती आवडली असेल अशी अशा करतो. जास्तीत जास्त रुग्णांनी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.