मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदराअंतर्गत हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण या आता या जगात राहिल्या नाहीत. उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
दीपाली दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या नावे ४ पाणी पत्र दीपाली यांनी लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवकुमारकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती लिहिले आहे. प्रशासकीय जाच, रात्री-बेरात्री संकुल, अकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न शिवकुमारने केला. शिवकुमार यांनी जाणूनबुजून जंगल फिरविल्याने गर्भपात झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या घटनेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या पत्रात दिपालीने उल्लेख केल्याप्रमाणे ती कॉल रेकॉर्डिंग आणि शिवकुमारविरुद्धचे इतर पुरावे घेऊन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भेटली होती. स्थानिक खासदारांकडून मदत मिळेल अशी अपेक्षा दीपालीला होती.
सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर आज दीपाली चव्हाण या वाचू शकल्या असत्या. सहसा नेते मंडळी त्यांच्याकडे आलेल्या समस्यांचे निरसन करतात. पण नवनीत राणा यांच्याकडून मात्र दिपालीच्या भेटीवर दुर्लक्ष झाले आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी आपण गमावली.
दीपाली चव्हाण यांची हरसाल मध्ये लेडी सिंघम अशी ओळख होती. दिपालीच्या वरिष्ठानी देखील यामध्ये हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. कारण तिने वरिष्ठ वन संरक्षक रेड्डी यांच्याकडे देखील तक्रार केली होती असे दिसून येते.
ऑक्टोबर २०२० मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते.
दरम्यान खा. नवनीत राणा यांनी यावर भाष्य करताना म्हंटले आहे कि, ‘दीपाली मला भेटली होती. मी तिच्या बदलीसाठी खूप प्रयत्न केला. मी स्वतः रेड्डीला फोनवर बोलले. या ताईची कुठेही बदली करा पण लवकर करा असं सांगितलं.’ एवढंच नाही तर रवी राणा यांनी देखील स्वतः वनमंत्री संजय राठोड यांना ४ वेळा कॉल करून बदलीसाठी विनंती केली. पण संजय राठोड यांनी देखील हो करू करू म्हणत टाळाटाळ केल्याचे त्या पुढे म्हणाल्या.