Monday , June 5 2023
Breaking News
Home / राजकारण / गनिमी कावा करून आपल्या जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसिमवीर आणणारा खासदार!

गनिमी कावा करून आपल्या जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसिमवीर आणणारा खासदार!

सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीचा कहर बघायला मिळत आहे. दररोज रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोनाच्या उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या रेमडिसिवीर इंजक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रेमडिसिवीर इंजक्शन मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.

अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे यांनी जे सरकारला नाही जमलं ते करुन दाखवलं आहे. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता विशेष विमानाने थेट दिल्लीवरुन रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा आपल्या मतदार संघातील रूग्णांसाठी आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन तब्बल १० हजार रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली आहेत

माझ्या कुवतीनुसार जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण घालू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले. मी फॅक्टरीत गेलो, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली.

दोन दिवसापूर्वी सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. त्यानंतर त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती जाहीर केली. ‘ही इंजेक्शन्स सर्व लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस उशिरा हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती, असं सुजय विखे पाटील म्हणाले.माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही सुजय विखेंनी ठणकावून सांगितले..

सुजयचा हा व्हिडीओ होत आहे व्हायरल-

कोण आहेत सुजय विखे?

सुजय विखे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. सुजय विखे पेशाने न्यूरोसर्जन डॉक्टर आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ते खासदार झाले. विखे कुटुंब हे काँग्रेसमधील एक मोठं नाव होतं. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडणार नसल्याचं सांगितल्यानंतर सुजय यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तसंच विखे-पाटील फाऊंडेशनचे ते प्रमुख आहेत. २०१३ पासून डॉ. सुजय विखे-पाटील हे राजकारणात सक्रिय असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक कॉंग्रेस अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.

सध्या अहमदनगर शहर आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली होती. त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी औषधांचा दिल्लीवरून मतदारसंघासाठी पुरवठा आणला. त्यांनी आणलेल्या औषधाबद्दल मतदारसंघातून आनंद व्यक्त केला जात आहे.

About Mamun

Check Also

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *