Friday , January 27 2023
Breaking News
Home / मनोरंजन / गाढवाच्या लग्नमधील सावळ्या कुंभाराची गंगी १४ वर्षानंतर आता दिसते अशी! ओळखणेही झाले कठीण..

गाढवाच्या लग्नमधील सावळ्या कुंभाराची गंगी १४ वर्षानंतर आता दिसते अशी! ओळखणेही झाले कठीण..

गाढवाचं लग्न या चित्रपटाचे नाव घेतलं कि आजही मकरंद अनासपुरे आणि इतर कलाकारांची जुगलबंदी आपल्याला आठवते. या चित्रपटाने मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता १४ वर्ष उलटून गेले असले तरी पण आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला कि लोक आनंदाने आपल्या कुटुंबाबरोबर तो बघतात.

गाढवाचं लग्न चित्रपटामधील अनेक डायलॉग आजची चाहत्यांना तोंडपाठ आहेत. खासकरून गंगीच्या ओव्या आणि मकरंद अनासपुरेचे हसून पोट दुखावणारे डायलॉग हे प्रचंड गाजले. ‘हे तर असं झालं कि रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातंय ओव्या’ या आणि अशा बऱ्याच म्हणींनी गंगीने चित्रपटात धमाल उडवून दिली होती.

गाढवाचं लग्न चित्रपटात गंगीची भूमिका राजश्री लांडगे या अभिनेत्रीने साकारली होती. राजश्रीने आपले चित्रपट सृष्टीतील पदार्पणच गाढवाचं लग्न मधील गंगी या भूमिकेद्वारे केले होते. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान तिने निर्माण केलं. आपल्या पहिल्याच चित्रपटात केलेल्या या भूमिकेसाठी तिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाला होता.

गाढवाचं लग्न मधील गंगीला आजही लोक विसरलेले नाहीयेत. राजश्रीला आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत प्रमुख भूमिकेत काम करता आलं. तिने या संधीचे सोनं करत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. गाढवाचं लग्न मधील यश मात्र तिला आयुष्यात जास्त यश मिळवून देऊ शकलं नाही. कारण गंगी पुन्हा जास्त चित्रपटात दिसली नाही.

गाढवाचं लग्न मधील गावरान गंगी आता बनली आहे ग्लॅमरस-

राजश्रीची गाढवाचं लग्न मधील भूमिका हि खूप गावरान शैलीची होती. पण आता हि गावरान गंगी खूप ग्लॅमरस झाली आहे. राजश्रीने आपल्या हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून ती गंगी आहे हे ओळखणेही कठीण झाले आहे. राजश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेले बोल्ड आणि होत फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राजश्रीने चित्रपटात जरी गावरान भूमिका केली असली तरी तिला खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न राहायला आवडतं. गंगीचा हा मॉडर्न लूक चांगला असला तरी तुम्हाला जुनीच गावरान गंगी आवडत असणार यात शंकाच नाही. तिच्या या नवीन लूकवर अनेक मिम देखील वायरल होत आहेत.

चित्रपट सृष्टीपासून दूर राहिलेल्या गंगीने म्हणजेच राजश्रीने सिटीझन या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करत सिनेमाची कथा आणि वेशभूषा सुध्दा पाहीली होती. तिच्या कारकिर्दीची आणि सामाजिक कार्याची दखल घेत तिला ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. गंगीने सिटीझन चित्रपटात प्रमुख भूमिका देखील साकारली होती. ती या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसली होती.

राजश्री लांडगेच जन्म पुण्यात झाला. कुठलाही अभिनयाचा वारसा तिच्या कुटुंबात नव्हता. पण तिला लहांपणीपासूनच अभिनयाची आवड होती. तिने अभिनयाचे स्वप्न घेऊन मुंबई गाठली. मुंबईत तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले. गाढवाचं लग्न मधील गंगीच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळाली.

About Mamun

Check Also

..म्हणून अशोक सराफांच्या कोणत्याही चित्रपटात शर्टाची दोन बटणे उघडीच दिसतील!

अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले एक वरदानच आहे. नुसत्या भुवया किंवा मिशा उडवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *