जेव्हा मोदीजी प्रधानमंत्रीपदाचा चेहरा म्हणून २०१४ साली पहिल्यांदा लोकांसमोर आले, तेव्हा त्यांनी प्रचारसभांमध्ये बोलताना काळा पैसा परत आणून लोकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. या कारणाने देशातील लोकांनी तातडीने बँकांमध्ये जनधन खातीही उघडली होती. परंतु आजपर्यंत त्या खात्यांमध्ये मोदींनी सांगितलेले १५ लाख रुपये आले नाहीत. परंतु एका जपानी कंपनीने केवळ रिट्विटच्या बदल्यात लोकांना फुकट पैसे वाटले होते.
जपानी अब्जाधीश आणि एका फॅशन कंपनीचे मालक असणारे युसाकू मिजावा ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांना ६७ कोटी रुपये वाटले होते. कारण काय तर अशाप्रकारे पैसे वाटल्याने लोकांच्या आनंदात वाढ होते की नाही ? हे त्यांना पहायचे होते.
आता हा काय प्रश्न झाला का ? या प्रश्नाचे उत्तर तर अगदी लहान मुलेही देऊ शकतात. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया ! पैसे कुणाला नकोय आणि तो देखील फुकट..
यासंबंधी युसाकुमिजावा यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, माझ्या प्रयोगासाठी मी १००० लोकांची निवड करणार आहे आणि त्यांना प्रत्येकी ६ लाख ७० हजार रुपये देणार आहे. त्यासाठी त्यांनी १ जानेवारीला एक ट्विट केले होते. त्या ट्विटला रिट्विट करणाऱ्या पहिल्या १००० लोकांना ही रक्कम दिली जाईल असे त्यांनी सांगितले होते.
आपल्या माहितीसाठी युसाकू मिजावा हा जगातील पहिला असा खासगी प्रवासी असेल जो इलोन मस्कच्या स्पेस-एक्स विमानात बसून चंद्राची परिक्रमा करणार आहे. यापूर्वीही युसाकू मिजावा एकदा चर्चेत आले होते, जेव्हा ते आपल्या गर्लफ्रेंडपासून विभक्त झाले होते आणि सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.