महाराष्ट्राच्या भूमीत एका शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या एका मराठमोळ्या अधिकाऱ्याने बिहार गाजवलं. बेधडक कामाची पद्धत असलेला हा मराठमोळा IPS अधिकारी आहे शिवदीप वामन लांडे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिवदीप यांनी बिहारचा सिंघम अशी ओळख निर्माण केली. बिहार गाजवणारा हा सिंघम आता महाराष्ट्राच्या सेवेत आहे. आणि तो महाराष्ट्र देखील गाजवत आहे.
४४ वर्षीय शिवदीप लांडे ATS चे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. शिवदीप वामनराव लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीपचं जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबातला. अकोला जिल्ह्यातील परसा गावात शिवदीप लांडे यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतच झाले.
त्यानंतर शिवदीपणे सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. शिवदीपच्या कुटुंबात एक मोठी बहीण, लहान भाऊ, आई वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. घरच्या परिस्थितीमुळे शिवदीपणे नोकरीसाठी मुंबई गाठली. मुंबईत इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्टरर म्हणून शिकवायला सुरुवात केली.
पण शिवदीपचं मन या नोकरीमध्ये रमत नव्हतं. त्याच्या मनात समाजासाठी काही तरी करायची तळमळ होती. ती तळमळ त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. शिवदीपणे खूप मेहनत करून यूपीएससीमध्ये यश देखील मिळवलं पण कलेक्टर होण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. रँक न मिळाल्याने आयपीएस पद स्वीकारावे लागले.
शिवदीप लांडे यांची प्रशिणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून बिहारच्या मुंगेरजवळच्या जमालपूर इथं नियुक्ती झाली होती. पोलिसांवर फा यरिंग करणाऱ्या न क्षलवाद्यांचा परिसर म्हणून या भागाला ओळखलं जात होतं. त्यामुळे इथे पोस्टिंग घ्यायला सर्व जण घाबरत असत. पण शिवदीपणे पहिली पोस्टिंग तिथेच घेतली.
शिवदीपणे बिहारमध्ये आपल्या कामाची छाप सोडली. त्यांना बिहारचे सिंघम म्हणून ओळखले जाऊ लागले. बिहारची राजधानी पाटणा मध्ये त्यांनी एसपी म्हणून देखील मोठं नाव कमावलं आहे. शिवदीपच्या बिहारमध्ये अनेक कारवाया गाजल्या. बिहारच्या मुलींमध्ये तर शिवदीपची खास हवा होती. कारण शिवदीपने कॉलेजमध्ये मुलींना त्रास देणाऱ्या मुलांचा खास बंदोबस्त केला होता.
कॉलेजच्या मुलींना शिवदीप लांडे यांनी आपला नंबर दिला होता. मुलांनी काही त्रास दिला तर त्या डायरेक्ट त्यांना कॉल करायच्या आणि पुढे मग त्या मुलांना ते नीट करायचे. शिवदीप आता महाराष्ट्रात सेवेत असून नुकतंच चर्चेत आलेलं मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी त्यांनी छडा लावला आहे.
शिवतारेंच्या मुलीशी केला प्रेमविवाह-
२००६ मध्ये बिहार केडरमध्ये मध्ये रुजू झालेले शिवदीप लांडे पुरंदरचे जावई आहेत. शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत. २०१४ मध्ये शिवदीप आणि ममता शिवतारे यांनी प्रेमविवाह केला. ममता आणि शिवदीप यांची ओळख एका मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघे चांगले मित्र बनले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.
शिवदीप याना बिहारमधून महाराष्ट्रात येण्यासाठी शिवतारे यांनी सुचवले होते व त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले. शिवदीप यांनी महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्यासाठी केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अर्ज केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवतारे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शब्द टाकला. त्यानंतर अखेर तीन वर्षांसाठी त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाचे केडर मिळाले.