Sunday , May 28 2023
Breaking News
Home / मनोरंजन / भि कारी समजून महिलेने रजनीकांतला दिले होते १० रुपये भी क, पुढे जे झालं ते वाचून अभिमान वाटेल

भि कारी समजून महिलेने रजनीकांतला दिले होते १० रुपये भी क, पुढे जे झालं ते वाचून अभिमान वाटेल

रजनीकांत हा साऊथच्या लोकांसाठी देव बनला आहे. रजनीकांत नेहमीच हा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. रजनीकांत हा मोठ्या प्रमाणात समाजसेवा आणि दान देखील करतो. रजनीकांतच्या माणुसकीचे अनेक किस्से गाजलेले आहेत. पण एक असा किस्सा आहे जो आपणास कदाचितच माहिती असेल.

रजनीकांत यांना एका मंदिरात एक अनुभव आला होता. रजनीकांत यांना एका महिलेने भि कारी समजून १० रुपये भी क दिले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ज्याची देवासारखी पूजा होते त्या रजनीकांतला भि कारी समजले. पण हे खरं आहे.

एका महिलेने १०-१२ वर्षांपूर्वी रजनीकांतला हे १० रुपये भी क दिले होते. हि घटना तेव्हाची आहे जेव्हा रजनीकांतचा शिवाजी हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला होता. यामुळे रजनीकांत एका मंदिरात आपला वेष बदलून सहकाऱ्यांसह दर्शनाला गेले होते.

एका महिलेने वेष बदललेल्या रजनीकांत याना त्यावेळी भि कारी समजलं. रजनीकांत हे त्यावेळी मंदिराच्या पायऱ्या चढत होते. हि महिला देखील त्यांच्यासोबत मंदिराच्या पायऱ्या चढत होती. तिने राजनीकांत याना एक वयस्कर आणि भि कारी समजले. तिने १० ची नोट काढली आणि रजनीकांत यांना दिली.

महिलेने भि कार समजून दिलेले १० रुपये रजनीकांत यांनी देखील काहीही न बोलता घेतले आणि स्वतःजवळ ठेवले. रजनीकांत जेव्हा मंदिरात पोहचले तेव्हा त्यांनी आपल्या पॉकेटमधील सर्व पैसे आणि १० रुपये देखील काढले आणि मंदिराच्या दानपेटीत टाकले.

हे सर्व ती महिला देखील तिथेच उभा राहून बघत होती. तिने रजनीकांत याना ओळखले. ती तात्काळ राजनीकांतजवळ गेली आणि त्यांची माफी मागत तिने दिलेले १० रुपये वापस मागू लागली. रजनीकांत महिलेला म्हणाले कि तुम्ही दिलेले १० रुपये माझ्यासाठी आशीर्वाद आहेत. त्यांनी ते आशीर्वाद म्हणून घेतले आणि मंदिरात दान म्हणून देवाच्या चरणी ठेवले.

About Mamun

Check Also

..म्हणून अशोक सराफांच्या कोणत्याही चित्रपटात शर्टाची दोन बटणे उघडीच दिसतील!

अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले एक वरदानच आहे. नुसत्या भुवया किंवा मिशा उडवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *