देशात राजकारणात आपण असे अनेकदा बघितले असेल किंवा अनुभवले असेल कि एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलाने वडिलांचं नाव वापरून काही तरी काम केलं. किंवा मग वडिलांच्या नावाने काही तरी उठाठेव केली. असेही अनेक उदाहरण आहेत कि नेत्यांची मुलं वडिलांचं नाव वापरून दादागिरी करतात. अगदी साधा नगरसेवकाचा मुलगा देखील वडिलांचं नाव वापरून पातळ हवा करत असल्याचे अनेकदा दृष्टीस पडते. वडिलांच्या नावाचा वापर करून व्हीआयपी वागणूक मिळवली जाते.
पण आज आपण अशा एका मुलीबद्दल जाणून घेऊया जी भारताच्या राष्ट्रपतींची लेक असूनही लोकांना कळू नाही म्हणून त्यांचं आडनाव देखील लावत नव्हती. अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर मात्र ती राष्ट्रपतींची लेक आहे हे सर्वाना कळलं आणि सर्व जण आश्चर्यचकित झाले. सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. कोणालाच विश्वास बसणार नाही असा हा किस्सा घडला होता. जाणून घेऊया कोण आहे हि राष्ट्रपतींची लेक आणि कुठे करत होती ती नौकरी..
‘जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दुसरो के कंधो पर तो जनाजे उठते है.’ हे शब्द या मुलींसाठी तंतोतंत लागू होतात. कारण वडिलांचं मोठं नाव न वापरता तिने स्वकर्तुत्वाने आयुष्यात आपल्या मार्गाने पुढे जायचं ठरवलं आणि नोकरी करत राहिली. हि मुलगी म्हणजे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुलगी स्वाती कोविंद आहे. स्वाती हि एअर इंडियामध्ये नोकरी करते. स्वाती हि राष्ट्रपती कोविंद यांची मुलगी असल्याची माहिती एअर इंडियाला देखील नव्हती. स्वातीने ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूएस सारख्या लांब पल्ल्याच्या देशामध्ये जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग 777 आणि 787 या विमानामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम केलंय.
पण हि बाब एअर इंडियाच्या एकाहि कर्मचाऱ्याला माहिती नव्हती. त्यांना हि गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वातीच्या विचारांची उंची यावरून कळते कि ती एअर इंडियामध्ये जॉब करताना स्वतःच आडनाव देखील वापरायची नाही. आडनावामुळे लोकांना आपण कोण आहोत हे कळू नये हा तिचा उद्देश होता. तिने आपल्या कागदपत्रांवर सुद्धा वडिलांचं नाव कळू नये म्हणून आर एन कोविंद लिहिलेलं आहे. नम्र स्वभाव असलेल्या स्वातीने खूप दिवस हे सिक्रेट कोणाला कळू दिले नाही.
स्वातीला रामनाथ कोविंद यांनी लहांपणीपासूनच स्वावलंबी बनण्यासाठी धडे दिले. ती वडिलांनी दिलेल्या संस्कारांना घेऊनच आयुष्यात वाटचाल करत आहे. स्वातीने कधीच आपल्या वडिलांचं नाव वापरून काही फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. २५ जुलै २०१७ रोजी रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा देखील स्वातीने सुट्टी घेतली होती. पण तिने टीममधल्या कोणालाच हि गोष्ट कळू दिली नाही कि ती वडिलांच्या शपथविधीसाठी सुट्टी घेत आहे.
या गोष्टीचा जेव्हा एअर इंडिया मध्ये खुलासा झाला त्यानंतर देखील स्वातीने आपली नोकरी नोकरी चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिला सुरक्षेसाठी नोकरी सोडणार का असे विचारण्यात आले तेव्हा देखील तिने बघू पुढे काय होते असे उत्तर दिले होते. स्वाती विमानात क्रू मेम्बर म्हणून काम करायची. पण एअर इंडियाने तिला सुरक्षेमुळे मुख्यालयात काम करण्यास पाठवले. स्वाती सध्या वडील रामनाथ आणि आई सविता यांच्या सोबत राष्ट्रपती भवन मध्ये राहते. स्वातीच्या मते त्यांचं पूर्ण कुटुंबच खूप सामान्य विचारांचे आणि जमिनीवर पाय असणारे आहे. कुटुंबातील सर्व सदस्य वडील रामनाथ यांच्याप्रमाणे स्वकर्तुत्वाने पुढे जाऊ इच्छितात. वडील रामनाथ हे स्वतः मेहनत घेऊन एवढ्या सर्वोच्च पदावर पोहचले याचा सर्वाना अभिमान आहे.
कोण आहेत रामनाथ कोविंद?
रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ ला उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात डेरापूर तालुक्याच्या परौंखे या छोट्या गावातील दलित कुटुंबात झाला. कोविंद यांचे प्राथमिक शिक्षण खानपूर येथे झाले. पुढे त्यांनी कानपूरच्या डीएव्ही लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली. वकिलीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात वकिलीहि केली. १९७७ मध्ये ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे खासगी सचिव होते. १९९१ मध्ये भाजपमध्ये आलेले कोविंद ११९४ ते २००६ राज्यसभेचे खासदार होते. २००१ मध्ये भोगनीपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती मात्र ते पराभूत झाले. रामनाथ कोविंद यांच्या मुलीच्या विचारांवरून त्यांनी आपल्या मुलांना कसं घडवलं याचा अंदाज येतो.