Sunday , May 28 2023
Breaking News
Home / देश-विदेश / जेव्हा सलूनमध्ये पडलेल्या केसांवरुन “रॉ” अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा ऍटोमिक प्लांट शोधला होता

जेव्हा सलूनमध्ये पडलेल्या केसांवरुन “रॉ” अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा ऍटोमिक प्लांट शोधला होता

कुठल्याही देशाच्या सुरक्षेमध्ये गुप्तचर संस्थांची भूमिका खूप महत्वाची असते. भारतातही अशी एक गुप्तचर संस्था आहे जिचे नाव आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग (RAW). पाकिस्तान आणि चीनच्या हरकतींवर नजर ठेवण्यासाठी १९६८ साली रॉ स्थापन झाली. आज आम्ही या गुप्तचर संस्थेच्या अशा एका मिशनबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये रॉ ने पाकिस्तनाला ना केवळ मोठा हादरा दिला, सोबतच आपले कर्तृत्व देखील सिद्ध करुन दाखवले होते.

१९७४ मध्ये भारताने पोखरण अ णुचाचणी घेतल्यानंतर पाकिस्तानलाही अ ण्वस्त्रसज्ज होण्याची गरज वाटू लागली. त्यानंतर अणु संसाधन प्रकल्प उभारण्यासाठी पाकिस्तानने हरप्रकारे आपले प्रयत्न सुरू केले. फ्रान्सने या याकामी त्यांना मदत केली.

चीनच्या तंत्रज्ञांनी अ ण्वस्त्रे बनवण्यासाठी लागणाऱ्या युरे नियमचा शोध घेण्यामध्ये पाकिस्तनाला मदत केली. परंतु पाकिस्तानच्या ढिसाळ गती आणि दुर्लक्षामुळे फ्रांस चिंतेत पडला. हळूहळू ते अमेरिकेच्या डोळ्यावर आले आणि त्यांनी फ्रान्सव दबाव टाकला. त्यानंतर फ्रान्सने पाकिस्तानची मदत करणे थांबवले.

सलूनमध्ये पडलेल्या केसांवरुन “रॉ”ने पाकिस्तानचा गुप्त प्रोजेक्ट शोधला

“कहुटा” याठिकाणी पाकिस्तानचा अणु संसाधन प्रकल्प होत असल्याबाबतची बातमी सुरुवातीला अफवेच्या रूपातच रॉ कडे आली होती. परंतु याची खात्री कशी करायची हा प्रश्न होता. रॉने एक शक्कल लढवली. कहूटामध्ये पाकिस्तानी शास्त्रज्ञ एका सलूनमध्ये केस कापायला यायचे.

रॉने त्यांच्यावर पाळत ठेवली. सलूनमध्ये केस कापताना फरशीवर पडलेले पाकिस्तानी शास्त्रज्ञांचे केस गोळा केले आणि प्रयोगशाळेत येऊन त्याची तपासणी केली. त्यांना त्या केसांमध्ये रेडि एशनचे अंश सापडले. रॉला समजले की पाकिस्तान युरे नियमवर काम करत आहे.

भारताप्रमाणेच इस्राईल देखील पाकिस्तनाच्या अ णु प्रकल्पाच्या विरोधात होता. इस्रायलची मोसाद आणि भारताची रॉ या दोन्ही गुप्तचर संस्था एकत्र पाकिस्तानवर लक्ष ठेऊन होत्या. रॉ ने कहूटा अ णु प्रकल्पाची माहिती इस्रायलला दिली. इस्राईल तो प्रकल्प बॉ म्बह ल्ल्याने उडवून देणार होता.

तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी चुकून पाकिस्तानी राष्ट्रपती जिया उल हक यांना आम्हाला आपल्या गुप्त प्रकल्पाची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर पाकिस्तान सतर्क झाला त्यांनी रॉच्या एजंटला पकडून त्याला आपल्या वाटेतून दूर केले. त्यानंतर पाकिस्तानने रॉ ची फार द हशत घेतली.

About Mamun

Check Also

जपानच्या या अब्जाधीशाने त्याचे ट्विट रिट्विट करणाऱ्या लोकांना फुकट वाटले ६७ कोटी रुपये

जेव्हा मोदीजी प्रधानमंत्रीपदाचा चेहरा म्हणून २०१४ साली पहिल्यांदा लोकांसमोर आले, तेव्हा त्यांनी प्रचारसभांमध्ये बोलताना काळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *