Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / स्पर्धा परीक्षा देण्याची तुझी लायकी नाही नाद सोड असं म्हणणाऱ्या नातेवाईकांना त्याने ACP होऊन दाखवलं!

स्पर्धा परीक्षा देण्याची तुझी लायकी नाही नाद सोड असं म्हणणाऱ्या नातेवाईकांना त्याने ACP होऊन दाखवलं!

आयुष्यात संकट अडचणी या येतच असतात. पण त्यावर मात करायची असेल तर तुमच्याकडे लागते जिद्द. तुम्हाला स्वतःवर विश्वास हवा. त्यानंतर तुम्ही आयुष्यात कुठल्याही संकटावर अडचणींवर मात करू शकता. आज अशाच एका पठ्ठ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने कमी वयातच बँकेत लागलेली नोकरी सोडून दिली. आणि आपले स्वप्न असलेला पोलीस अधीकारी तो झाला. त्याला एकेकाळी स्वतःच्या मामाकडूनच स्पर्धा परीक्षा तुझ्याकडून होणार नाही नाद सोडून दे असे ऐकावे लागले त्याच पठ्ठ्याने मोठा पोलीस अधिकारी होऊनच दाखवलं.

हा पठ्ठ्या आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावचा ACP श्रीकांत दिसले. जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण झालेल्या श्रीकांतचे वडील हे सैन्यात होते. त्यामुळे लहानपणीपासूनच वर्दीशी एक भावनिक नातं होतं. श्रीकांतचं पण लहानपणीपासून आर्मीत जाण्याचं स्वप्न होतं. श्रीकांतने सैन्यात जाण्यासाठी NDA परीक्षा देण्याचं ठरवलं. त्यासाठी पुण्यात ऍडमिशन घेतलं. ११-१२ वी चं शिक्षण पुण्यातच सायन्समध्ये झालं. भावाकडे राहणारा श्रीकांत दिवसभर क्लास कॉलेज यामध्येच व्यस्त असायचा. २ वर्ष खूप अभ्यास केला. बारावी खूप चांगल्या मार्काने पास झाला. पण ज्या NDA च्या परीक्षेसाठी पुण्यात आला होता त्याच परीक्षेत श्रीकांत नापास झाला.

पण मनाशी निश्चय केलेला होता कि भविष्यात अधिकारी होऊन वर्दीच घालायची. अपयशाने तो खचून गेला नाही. बारावी झाल्यावर श्रीकांतने इच्छा नसताना नातेवाईकांच्या सल्ल्याने डीएडला प्रवेश घेतला. सोलापूरमध्ये डीएडला प्रवेश घेतल्यानंतर वडिलांमुळे आर्मी हॉस्टेलला राहायची व्यवस्था झाली. तिथं एकप्रकारे आर्मीचे आयुष्य जगायला मिळाले. तेथील लाइफस्टाइल पूर्ण आर्मीची होती. स्वप्न डोक्यात होतंच. त्यादृष्टीने अभ्यास देखील सुरु होता.

श्रीकांतने जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं असं मामाला सांगितलं तेव्हा मामाने म्हंटले कि नको नादी लागूस. स्पर्धा परीक्षा तुझ्याच्याने होणार नाही असं मामांनी सांगितलं. मामांनी त्या प्रेरित करण्याऐवजी त्याच खच्चीकरणच केलं. पण श्रीकांतने कोणाचं काहीच मनावर घेतलं नाही. स्वतःवर विश्वास ठेवला. आर्मी हॉस्टेलचा रूम पार्टनर बँकिंगची तयारी करत होता. त्याने श्रीकांतला देखील परीक्षा दे असे सुचवले. पण श्रीकांत मात्र पोलीस अधिकारीच होण्यासाठी बनला होता. त्याने बँकिंगचा अभ्यास केला. पुण्यात दोघांनी येऊन परीक्षा दिली. निकाल लागल्यावर वेगळंच झालं. आधीपासून तयारी करणार मित्र नापास झाला आणि श्रीकांत पास झाला.

या परीक्षेतील यश आत्मविश्वास वाढवणारे होते. घरच्यांना देखील मुलगा २०व्या वर्षीच बँकेत लागला म्हणून खूप आनंद झाला. डीएडदेखील झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाली होतं. सर्व नातेवाईक देखील खुश होते. पण श्रीकांतला प्रश्न पडला होता कि स्पर्धा परीक्षा द्याव्यात का बँकेत नोकरी करावी. वडिलांना सांगून पण बघितलं पण त्यांनी ऐकलं नाही. मग नोकरी जॉईन करावी लागली. मुंबई शहरमध्ये नोकरी जॉईन केली. नोकरी जॉईन केल्यावर देखील त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. नोकरी सोडायचा विचार सारखा डोक्यात येत होता. पण घरचे ऐकत नव्हते.

श्रीकांतने घरच्यांना न सांगता बँकेतील नोकरी सोडण्याचं ठरवलं. घरी बँकेतून मेडिकल लिव्ह टाकली असं सांगून श्रीकांतने बँकेची नोकरी सोडली. आपल्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकलं. बँकेतून एक पत्र घरी गेल्यामुळे वडिलांना नोकरी सोडल्याचे कळले. त्यानंतर वडील खूप ओरडले. पण श्रीकांतने मुंबईतून घरी जाऊन वडिलांना समजावून सांगितलं. आपलं स्वप्न पूर्ण करणार असं सांगितलं. नंतर वडिलांनी देखील त्याचं ऐकलं अन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास परवानगी दिली.

पुण्यात तयारी केली. श्रीकांतला बँकेतील नोकरी सोडताना PSI ची पूर्व परीक्षा पास झाल्यामुळे जास्त आत्मविश्वास वाढला होता. २ वर्ष खूप मेहनत घेतली. वडिलांना शब्द दिल्याप्रमाणे २३ व्या वर्षीच जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी हे क्लास वन पद मिळवलं होतं. दुसरे देखील अनेक पद मिळाली होती. पण वर्दीचं स्वप्न अजून बाकी होतं. गावाकडे सत्कार झाले सर्वत्र कौतुक झालं. पण श्रीकांतने पुन्हा पुण्यात तयारी सुरु केली. खूप तयारी करून परीक्षा दिली. त्याच दरम्यान उस्मानाबादला त्याने आपलं पद स्वीकारलं होतं. रिजल्ट लागला आणि श्रीकांतचं स्वप्न पूर्ण झालं. श्रीकांत ACP झाला.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *