Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / ज्या अदर पूनावालांनी देशाला दिली लस त्यांच्यासोबत भारतीयांनी केली लाज वाटेल अशी गोष्ट!

ज्या अदर पूनावालांनी देशाला दिली लस त्यांच्यासोबत भारतीयांनी केली लाज वाटेल अशी गोष्ट!

कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु झाल्यानंतर कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीची निर्मिती करण्याची तयारी दाखवणारे सीरम इन्स्टिस्टूट चर्चेत आले. अदर पुनावाला हे देशाला कोरोना लढ्यात आशेचा किरण असलेल्या लशीची निर्मिती करणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस कोरोनाविरुद्ध खूप प्रभावी ठरत असून कोरोना लढ्यात त्यामुळे मोठे यश मिळाले आहे. पूनावाला यांच्या कंपनीने AstraZeneca सोबत टाय-अप करुन कोरोना लसीची निर्मिती केली आहे.

सध्या लशीच्या पुरवठ्यावरून देशभरात मोठी चर्चा सुरु असून लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे सर्वच राज्याचे म्हणणे आहे. सिरमकडून होणारी लस निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु असून केंद्र सरकारकडे याचे सध्या नियंत्रण आहे. लशीच्या पुरवठ्यावरून राजकारण देखील मोठ्या प्रमाणात होत असून केंद्र सरकारवर आरोप देखील राज्य करत आहेत. सिरमचे सर्वेसर्वा अदर पूनावाला यांचे नाव कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यांना महाग लस देत असल्यामुळे पूनावाला यांच्यावर टीका देखील नेटकाऱ्यानी केली होती. त्यानंतर राज्यांना देण्यात येणाऱ्या लशीची किंमत ४०० वरून३०० करण्यात आली. अदर पूनावाला हे सध्या लंडनमध्ये राहत आहेत. काही दिवसांपूर्वी ते भारतातून बाहेर गेले आहेत. त्यांनी लंडनमध्ये एक घर भाड्याने घेतलं आहे. या भाड्याच्या घरासाठी 50 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 50 लाख रुपये इतकं भाडं ते देत आहेत. विशेष म्हणजे हे भाडं काही महिन्याचं भाडं नाहीये तर आठवड्याचं आहे. त्यांनी भाड्याने घेतलेली ही प्रॉपर्टी लंडनमधील पॉश मेफेअर भागातील आहे. फक्त लंडनच नव्हे तर जगातील सर्वाधिक महागड्या अशा भागापैंकी एक असा हा भाग आहे, जिथे आदर पूनावालांनी हे घर घेतलं आहे.

पूनावाला यांना मागील आठवड्यातच केंद्र सरकारने ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. १६ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पूनावाला यांना संरक्षण देण्याची विनंती केली करण्यात आली होती, यानंतर केंद्राने त्यांना संरक्षण दिले. दरम्यान अदर पूनावाला यांनी आंतरराष्ट्रीय टाईम मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. हे वक्तव्य भारताची मान शरमेने खाली घालणारे आहेत.

अदर पूनावाला यांनी म्हंटलं आहे कि भारतातून लशीसाठी त्यांना फोन येत असून अनेकांकडून धमकी देखील दिली जात आहे. कॉल करणाऱ्यांमध्ये साधेसुधे व्यक्ती नसून काही मुख्यमंत्री, अनेक मोठे उद्योगपती, व्यापार मंडळाचे प्रमुख यांचा समावेश असल्याचं पूनावाला यांनी म्हंटल आहे. देशासाठी हि एक मोठी लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं जात आहे. कारण त्यांनी पुढे बोलताना सध्या भारतात परतणार नसल्याचे देखील म्हंटले आहे.

ते म्हणाले भारताचा लशीचा सर्व भार माझ्या खांद्यावर आला असून मी एकटा ती पूर्ण करू शकत नसल्याचं ते म्हणाले. देशात कोरोना लशीची आवश्यकता असून आम्ही पूर्ण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पण आम्हाला लस द्या म्हणून मिळणाऱ्या धमक्या या खूप हैराण करणाऱ्या आहेत असे ते म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूट सध्या पुण्यात लस निर्मिती करते. सिरमने उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या मदतीची वाट न बघता बँकांकडून लोन घेऊन लस उत्पादन वाढवलं आहे. नुकतच केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला ३ हजार कोटी देणार असल्याची घोषणा देखील केली आहे. टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी ब्रिटनमध्ये लस निर्मितीची फॅक्टरी देखील चालू करण्याचं म्हंटल आहे. भारतात मिळालेल्या धमक्यांमुळे पुनावला हे पाउल उचलत असावेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

About Mamun

Check Also

धीरूभाई अंबानी यांनी नसली वाडियांची सुपारी दिल्याचा मुबई पोलीस आयुक्तांनी केला होता गौप्यस्फोट

धीरूभाई अंबानी आणि नसली वाडिया ही भारतीय उद्योग जगतातील बलाढ्य अशी नावे आहेत. गुजराती कुटुंबात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *