Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / ज्या गावातील लोकांनी टोमणे मारले, तिथलीच पहिली ऑफिसर बनून तिने दिलं उत्तर!

ज्या गावातील लोकांनी टोमणे मारले, तिथलीच पहिली ऑफिसर बनून तिने दिलं उत्तर!

एखादं स्वप्न मनात असेल तर ते आपल्याला शांत झोपू देत नाही. असंच काहीसं तिचं होतं. तिला तर तिचं स्वप्न प्रयत्न न करता सोडावं लागलं होतं. कारण घरच्यांकडून लग्नासाठी खूप दबाव होता. तिला सर्व सोडून लग्न करावे लागणार होते. साखरपुडाही झाला. पण तिने घरच्यांकडे एक वर्षाचा वेळ मागितला आणि स्वप्नाकडे वाटचाल केली. पण एक मोठं संकट आलं. पण तिने हार मानली नाही आणि गावातली पहिली ऑफिसर बनली. जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास..

तिचं नाव आहे स्नेहा मधुकर चौधरी. जळगावच्या कासोद्याची एका सामान्य घरातली मुलगी. स्नेहा लहानपणी पासून ऐकत आली कि मुलींनी चौकटीत राहायला हवं. पण तिला काही हे पटत नव्हतं. तिला आयुष्यात काही तरी वेगळं करायचं होतं. इंडियन एअरफोर्स मध्ये जाऊन फ्लाईंग ऑफिसर व्हायचं स्वप्न तिने बघितले. दहावी बारावी पर्यंत शिक्षण तिने घेतलं. बारावी सायन्समध्ये तिला चांगले मार्क मिळाले. पुढे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण तिला नाईलाजाने कॉम्पुटर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा लागला.

पण तिने सेकंड इयरला गेल्यावर घरच्यांना सांगितलं कि मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची आहे. केली तर मी तीच इंजिनिअरिंग करणार असं कडाडून सांगितलं. घरच्यांचा याला खूप विरोध होता. शेवटी घरच्यांना तिने तयार केलं आणि मेकॅनिकलला गेली. मेहनत आणि खूप अभ्यासाच्या बळावर तिने इंजिनिअरिंग पूर्ण केली.

तिने तिच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकलं होतं. तिला फ्लाईंग ऑफिसर व्हायचं होतं. पण पुन्हा लग्नाला अडचण येईल म्हणून वडिलांनी त्यासाठी विरोध केला. तिला लहांपणीपासूनच स्वप्न सोडून द्यावं लागलं. ती खूप निराश झाली. अनेक रात्री झोप आली नाही. नातेवाईक लग्नासाठी विचारपूस करायला लागले. खूप शिक्षण झालं म्हणून सर्वच बोलत होते. तिला मात्र काही तरी करून दाखवायचं होतं.

एका सरांच्या मार्गदर्शनाने तिने स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरवलं. पण घरच्यांची लग्नाची घाई सुरूच होती. तिने घरच्यांकडे १ वर्ष मागितलं. तिच्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. परीक्षेत यश नाही मिळवलं तर लग्न करून शांत बसावं लागलं असतं. पण शांत राहणाऱ्यातली स्नेहा नव्हती. तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. ८-९ तास ती अभ्यास करायची. तिला इतिहास भूगोल आणि इतर विषयाचा खूप सुरुवातीपासून अभ्यास करावा लागला. कारण तिने इंजिनिअरिंग केलं होतं.

सगळं शून्यातून सुरु करून तिने संघर्ष सुरु केला. मोठी तयारी करून तिने पहिली पूर्व परीक्षा दिली खरी पण तिला अपयश आलं. नेमकं ती या टेन्शनमध्ये असतानाच आईचा रेल्वेतून उतरताना अपघात झाला. आईचा पाय मोडला होता. ६ महिने तीला बेडवर काढावे लागणार होते. त्यामुळे स्नेहल सर्व सोडून घरी जावं लागलं. तिला अभ्यासाला वेळच मिळेना झालं. आईला भेटायला येणारे तर होतेच पण सोबत तिला बघायला देखील पाहुणे यायला लागले.

पुढे तिचं लग्न जमलं आणि साखरपुडाही झाला. तिने MPSC चा फॉर्म भरला होता. तिच्यासाठी सर्व अनपेक्षित होतं. लग्नाच्या १५ दिवस आधीच पूर्व परीक्षा आली. तिने परीक्षा देऊन लग्नाची तयारी सुरु केली. लग्न झालं आणि ती अलाहाबादला राहायला गेली. पुढे पूर्व परीक्षेचा निकाल आला. ती पास झाली होती. पण मुख्य परीक्षेसाठी एकच महिना होता. तिचा शेवटचा चान्स होता. सासरच्यांचा सपोर्टने तिने तयारी सुरु केली.

तिला नेमकं परीक्षेआधी व्हायरल इन्फेक्शन झालं आणि दूध आणि नारळपाण्यावर दिवस काढावे लागले. तिला तेव्हा सोडून द्यावं असं देखील वाटलं. तिने खूप तयारी करून परीक्षा दिली पण परीक्षेच्या निकालावर आक्षेप घेतला गेला. कोर्टात केस चालू होती. लोक तिला टोमणे मारायला लागले. पण तिच्या नशिबात यश होतं. सप्टेंबर २०१९ मध्ये निकाल आला आणि स्नेहा राज्यात ओबीसी महिलांमध्ये राज्यात विसावी येत पास झाली. जे लोक विरोध करायचे टोमणे मारायचे ते आता पुढे पुढे करत होते. ती सहायक मोटार वाहन निरीक्षक बनली होती. सोबतच गावातली पहिली ऑफिसर बनली. गावात बॅनर लागले होते.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *