Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / झोमॅटो बॉय कामराज आणि मॉडेल हितेशा वादाची दुसरी बाजू जी प्रत्येकाला माहिती असायला हवी!

झोमॅटो बॉय कामराज आणि मॉडेल हितेशा वादाची दुसरी बाजू जी प्रत्येकाला माहिती असायला हवी!

सध्या सर्वत्र झोमॅटो डिलिव्हरी बॉय आणि मॉडेल हितेशा यांच्या वादाची चर्चा सुरु आहे. झोमॅटोवरून मागवलेले जेवण यायला उशीर झाल्याने हा वाद झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला मॉडेल हितेशा हिने एक व्हिडीओ पोस्ट करून तिच्यासोबत काय घडलं याची कैफियत मांडली होती. त्यानंतर सर्वत्र तिला पाठिंबा देखील मिळाला. झोमॅटोने डिलिव्हरी बॉयला तातडीने नोकरीवरून काढून टाकले.

पण या घटनेत हितेशाने सांगितली तेवढीच सत्यता नाहीये. तर या वादाची दुसरी बाजू सांगितली आहे झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज याने. त्याने सांगितलेली माहिती हि त्याला निर्दोषत्व देणार नाही पण त्याची या घटनेत काही चूक नव्हती हे दर्शवणारी आहे.

जाणून घ्या वादाची दुसरी बाजू-

हितेशाच्या मते तिने झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केले. ते यायला एक तासापेक्षा अधिक वेळ लागला. त्यानंतर तिने ते जेवण डिलिव्हरी बॉयला रद्द करण्यास सांगिलते किंवा ऑर्डरला उशीर झाला म्हणून फ्री मध्ये देण्यास सांगितले. यावरून रागावलेल्या कामराजने तिच्या नाकावर बुक्का मारला. याची दुसरी बाजू आता समोर आली आहे.

कामराजने हितेशाचे सर्व दावे फेटाळले आहेत. कामराज हा २ वर्षांपासून झोमॅटो मध्ये काम करत आहे. कामराजने २६ महिन्याच्या त्याच्या कार्यकाळात ५ हजाराहून अधिक ऑर्डर डिलिव्हरी केल्या आहेत. त्याच्या कामाला ग्राहकांनी ४.७५ रेटिंग दिले आहे. यावरून तो चिकाटीने काम करायचा याचा प्रत्यय येतो.

जेव्हा हितेशाची ऑर्डर घेऊन कामराज निघाला त्यावेळची त्याला खराब रस्ते आणि ट्रॅफिकमुळे थोडा जास्त उशीर झाला. रस्त्याचे काम ठिकठिकाणी चालू होते त्यामुळे देखील त्याचा वेळ गेला. त्याला हे लक्षात आल्यामुळे त्याने हितेशाकडे गेल्यावर ऑर्डरला उशीर झाला म्हणून अगोदर माफी देखील मागिलती. कामराजने अशाप्रकारे पहिल्यांदाच झाल्याचे हितेशाला सांगितले.

पण हितेशा काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. तिने कामराजकडून ऑर्डर घेतली. आणि पैसे देण्यास नकार दिला. झोमॅटो कस्टमर सपोर्ट सोबत ती बोलत असल्याचे त्याला सांगितले. ती फ्री मध्ये जेवण मागत होती. त्यामुळे कामराजने ऑर्डर कॅन्सल झाली सांगून ते पार्सल परत मागवले. पण हितेशा भडकली आणि तिने गोंधळ सुरु केला. कामराजला तिने शिवीगाळ केली.

अखेर कामराज ऑर्डर सोडून जात होता तरी देखील तिचा गोंधळ सुरूच होता. त्यानंतर तिने कामराजला चपलेने मारायला सुरुवात केली. त्यावेळी तिचाच हाथ नाकावर लागला. अंगठीमुळे जास्त लागलं. तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, ठोसा लगावल्यामुळे नाही, असे तो म्हणाला. कामराजने सांगितलेला हा घटनाक्रम ऐकून सोशल मीडियावर अनेकजण त्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *