Monday , June 5 2023
Breaking News
Home / क्रीडा / टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा नेमका आहे तरी कोण?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा नेमका आहे तरी कोण?

ऑलिम्पिकच्या इतिहासात अ‍ॅथलेटिक्समधील ऐतिहासिक पहिलं सुवर्णपदक आज भारताने जिंकलं. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा हा दुष्काळ संपवला आहे. प्रचंड आत्मविश्वासात अंतिम फेरीची सुरुवात केलेल्या नीरज चोप्राने पहिल्या व दुसऱ्याच प्रयत्नात असा भाला फेकला कि विरोधी खेळाडू त्याच्या आसपासही आले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी अभिनव बिंद्राने २००८ मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.

नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना दूर फेकलं. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. ती कसर आज निरजने भरून काढली. जाणून घेऊया नीरज चोप्रा नेमका आहे तरी कोण..

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंद्रा गावात जन्मलेला नीरज चोप्रा हा भारतीय सैन्यात सुभेदार आहे. निरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ साली झाला. तो अवघ्या २३ वर्षाचा आहे. निरजच्या वडिलांचं नाव सतीश कुमार तर आईच नाव सरोज देवी आहे. नीरजचे पिता हे एक शेतकरी आहेत. नीरजला २ बहिणी देखील आहेत. नीरजच्या गावातील प्रत्येक तरुण भालाफेक मध्ये करिअर करण्यासाठी धडपड करतो. लहानपणीपासूनच खेळाची आवड असलेल्या नीरजला कबड्डी आणि व्हॉलीबॉल जास्त आवडायचा. पण तो १४ वर्षाचा असताना जेवेलिन थ्रो सोबत त्याची जवळीक वाढली.

नीरजचं लहानपणी वजन खूप जास्त होतं. त्यामुळे त्याला घरच्यांनी जिमला पाठवायला सुरु केलं. पण नीरजला ते सुख नव्हतं मिळत जे त्याला हवं होतं. त्यामुळे तो १६ -१७ किमी दूर असलेल्या स्टेडियममध्ये जाऊ लागला. स्टेडियममध्ये दुसऱ्या ऍथलिटना बघून तो देखील ऍथलिट बनण्याचं स्वप्न बघायचा.

स्टेडियममधील सर्व ऍथलिटना बघून नीरज पेचात पडला होता कि कोणता खेळ निवडावा. पण सर्व प्रयत्न केल्यानंतर त्याने भालाफेक मध्ये आपलं करिअर बनवलं. याला कारण म्हणजे लहानपणी तो दगडं आणि दांडके खूप फेकायचा त्यामुळे त्याला हा खेळ चांगला वाटला.

याशिवाय स्टेडियममध्ये एक प्रसंग घडलेला जो नीरजला या खेळामध्ये घेऊन आला. नीरजचा एक मित्र जयवीर हा तिथं रोज भालाफेक ची प्रॅक्टिस करायचा. एके दिवशी त्याने सहज निरजला भाला फेकायला सांगितलं. त्याने फेकलेला भाला बघून जयवीरने त्याला भालाफेक ची प्रॅक्टिस करायला सांगितलं. त्याला अडचण आली ती वजनाची. कारण त्याच तेव्हा वजन ८० किलो होतं. पण त्याने २ महिन्यातच २० किलो वजन कमी केलं आणि तयारी सुरु केली.

नीरजसमोर चांगली जेवलिन खरेदी करण्याची देखील अडचण आली. कारण चांगल्या कंपनीची जेवलिन हे जवळपास लाखाच्या पुढे जाते. पण निरजला एव्हडी महाग जेवलिन घेऊन देण्याची घरची ऐपत नव्हती. नीरजने ६-७ हजाराची जेवलिन खरेदी करून प्रॅक्टिस सुरु केली. तो ७-७ घंटे जेवलिन थ्रोची प्रॅक्टिस करायचा. यामुळेच तो एवढा चांगला खेळाडू बनला.

२०१२ मध्ये अंडर १६ नॅशनल जुनियर चॅम्पियनशिपमध्ये त्याने ६८.४६ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकून इतिहास रचायला सुरुवात केली. या सुवर्णपदकांनंतर त्याची नायब सुभेदार पदी निवड झाली होती. त्यानंतर नीरजने कधीच मागे वळून बघितलं नाही. २०१६ च्या जुनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भाला फेकून त्याने रेकॉर्ड बनवला होता. तर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये देखील ८६.४७ मीटर भाला फेकत पदक जिंकलं होतं. त्याच्या कामगिरीच्या बळावरच तो जेवेलियन थ्रो मध्ये सुपरस्टार बनला. नीरज चोप्राला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नीरजच्या या सुवर्णमय कामगिरीला सलाम.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *