एखाद्या टोलनाक्यावर तुम्हाला कधी तरी अनुभव आला असेल कि एखादा व्यक्ती टोलमध्ये सूट मिळवण्यासाठी आपल्या ओळखीचा वापर करत आहे. आपल्या पदाचा, ओळखीचा आणि स्टेट्सचा वापर करून विविध गोष्टीत सूट मिळवणारे अधिकारी, राजकारणी देखील आपण नेहमी बघतो. टोल नाक्यावरील कर्मचारी देखील अशा व्यक्तींना क्वचितच विरोध करतात.
सरकारी कर्मचारी, सरपंच, नगरसेवक पासून ते आमदाराची गाडी सांगून टोल न भरणारे व्यक्ती आपल्याला टोलनाक्यावर बघायला मिळू शकतात. १००-२०० रुपयांसाठी अनेकदा काही जण तर वाद देखील घालत असतात. पण आता टोल कर्मचारी देखील जागरूक झाल्याचं दिसत आहे. याचं एक ताज उदाहरण नुकतंच बरेली मुरादाबाद महामार्गावर पाहायला मिळालं.
झालं असं कि या महामार्गावरील टोल नाक्यावर एका न्यायाधीशाची गाडी आली. आता सरकारी न्यायाधीश म्हणलं कि टोल भरायचं कामच नाही. न्यायाधीश बिना टोल भरता जाणार. पण इथे मात्र या न्यायाधीशाच्या गाडीला अडवण्यात आलं आणि या न्यायाधीशाला टोल मॅनेजरने कायद्याचा चांगलाच धडा शिकवला.
या न्यायाधीशाची गाडी जेव्हा टोल नाक्यावर आली तेव्हा त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना आपलं आयकार्ड दाखवलं. त्यांनी आधी देखील असंच आयकार्ड दाखवून टोलमध्ये सूट मिळवली असणार यात शंकाच नाही. पण येथे मात्र उलटं झालं. येथील कर्मचारी हुशार निघाले. या न्यायाधीशांच्या आयकार्ड वर जिल्हा न्यायाधीश लिहिलेलं होतं.
खरंतर टोलमध्ये सूट हि फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना मिळते. या न्यायाधीशाने टोल कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. त्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून द्या म्हणून सांगितले. पण या कर्मचाऱ्याने मात्र एक ऐकलं नाही आणि जज साहेबांची चांगलीच शाळा घेतली.
जज साहेबांच्या या कृत्यामुळे तिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. जिल्हा न्यायाधीश असलेल्या या जजला या कर्मचाऱ्याने चांगलाच कायदा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही या कर्मचाऱ्याने कशी न्यायाधीशांची शाळा घेतली बघू शकता. या जजने कर्मचाऱ्याला सांगितले कि ते राजस्थान मध्ये प्रदेशमधून आले पण त्यांना कुठेच टोल द्यायचं काम पडलं नाही.
या अधिकाऱ्याने जजला यावरून खूप सुनावले. तुम्ही लोकांना कोर्टात तारखांवर तारखा देऊन त्याला परेशान करून टाकता. कोर्टात कसं सामान्यांना वेठीस धरलं जातं याची देखील आठवण त्या जजला करून दिली. कोर्ट हे नियमापेक्षा मोठं नसल्याचं म्हणत मॅनेजरने जजला संविधानाची आठवण करून दिली. या जजला त्या कर्मचाऱ्याने एवढे सुनावले कि त्याला टोल भरावाच लागला.
या टोलची रक्कम होती फक्त ८० रुपये. हि भरायला देखील जज सारखा एखादा मोठा व्यक्ती जर टाळत असेल तर यावरून तुम्हाला बाकी गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. हि घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. पण याचा व्हिडीओ मात्र आता वायरल झाला आहे. जिथे सामान्य नागरिक पैसे भरतात तिथे अशा मोठ्या अधिकाऱ्यांना पैसे भरू वाटत नाहीत म्हणजे कठीण आहे.
बघा व्हिडीओ-
जज साहब का भी जी ना करता टोल देने का pic.twitter.com/cNTsp8rJ3x
— Dadi Chandro Tomar (@realshooterdadi) March 13, 2021