Monday , June 5 2023
Breaking News
Home / राजकारण / …तर मोदींऐवजी हा मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान राहिला असता!

…तर मोदींऐवजी हा मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान राहिला असता!

भारतीय राजकारणात मोदी हे नाव आज वेगळ्या उंचीवर पोहचले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी आलेली मोदी लाट आजपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये. भाजपने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता मिळवली. भाजपच्या या विजयाचे शिल्पकार होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने २०१९ मध्ये देखील मोठा विजय मिळवला. आज भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा दिसत असला तरी या कामगिरीत अनेक वर्षांचा अनेक नेत्यांचा संघर्ष आहे.

नरेंद्र मोदी हे आज देशाचे पंतप्रधान आहेत पण त्यांच्याजागी एक मराठी माणूस देखील आज पंतप्रधान राहिला असता. पण त्या नेत्याने अकाली या दुनियेतून एक्सिट घेतली. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून स्व. प्रमोद महाजन आहेत. प्रमोद महाजन यांनी आयुष्यात खूप संघर्ष करून भाजप पक्ष वाढवला. पण त्यांच्यासोबत घडलेल्या दुःखद घटनेने ते भाजपचे यश बघायला राहिले नाहीत.

प्रमोद व्यंकटेश महाजन यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९४९ ला मराठवाड्यासारख्या मागास भागात झाला. महाजन कुटुंब उस्मानाबादला भाड्याच्या घरात राहत असे. पुढे ते अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात राहू लागले. बालपण अंबाजोगाईत गेले. प्रवीण, प्रकाश आणि प्रज्ञा हि त्यांची बहीण भावंडं. वडिलांचं ते २१ वर्षीचे असताना निधन झालं. योगेश्वरी महाविद्यालयात शिक्षण झालं. पुढे रानडे इन्स्टिट्यूट मध्ये पत्रकारितेत डिग्री मिळवली. पुढे १९७२ मध्ये रेखा हमीने यांच्याशी विवाह केला.

वडील शिक्षक होते. सुरुवातीला ते पत्रकारितेत संधी नसल्याने वडिलांसारखं खोलेश्वर कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवू लागले. प्रमोद महाजन हे वक्तृत्वाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच प्रतिभावान होते. राजकीय चर्चांमध्ये तर त्याकाळी त्यांचा हाथ कोणी धरू शकत नसे. त्यांनी अनेक भाषणांच्या आणि वादविवाद स्पर्धा त्याकाळी जिंकल्या. त्याच वेळी एका शाळेत त्यांची गोपीनाथ मुंडे यांच्याशी ओळख झाली. याच जोडीने महाराष्ट्रात भाजपसाठी मजबूत संघटन तयार केलं. त्यांची खास मैत्री पुढे नात्यात देखील बदलली.

विशेष म्हणजे आपल्या आयुष्यात काय करायचं हे देखील त्यांना माहिती नव्हते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचा टाइपरायटिंग सर्टिफाईड प्रोग्राम पास केला. प्रमोद हे RSS सोबत लहानपणीपासूनच जोडले गेले होते. १९७०-७१ मध्ये ते तरुण भारत या दैनिकाशी देखील जोडले गेले. आणीबाणीच्या काळात ते राजकारणात आले. संघाने १९७४ ला त्यांना प्रचारक केले. त्या काळात केलेल्या कामामुळे त्यांनी नाव कमावलं. पुढे नव्याने आलेल्या भाजपमध्ये ते सक्रिय झाले.

मुंडे आणि महाजन या जोडीने भाजपची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रुजवली. या दोघांनी त्याकाळी मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. प्रमोद महाजन हे राजकारणात अटल बिहारी वाजपेयी याना गुरु मानायचे. भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरु केलेल्या प्रमोद यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली.

१९८४ ला ते इंदिरा गांधींच्या लाटेत लोकसभा निवडणूक हरले. पुढे १९९६ ला उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. भाजपच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री बनले पण सरकार १३ दिवसात कोसळलं. १९९८ ला फेरनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण भाजप सत्तेत आल्याने त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा ते केंद्रीय मंत्री बनले होते. पुढे अनेक मंत्रिपद भूषवली.

नावातच पीएम असलेला हा नेता पंतप्रधानपदाकडे घोडदौड करत होता. अटल बिहारीनंतर कोण असा प्रश्न पडला कि लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन हि नावे समोर यायची. राजकारणात असलेली त्यांची पकड आणि व्यवस्थापन कौशल्यामुळे भाजपची सत्ता आल्यावर ते पंतप्रधान बनतील अशी आशा होती. पण नियतीला हे मान्य नव्हते. तिने अकाली महाजनांना हिरावून नेले.

About Mamun

Check Also

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *