Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / ..तर संजय गांधींसोबत विमान अपघातात माधवराव सिंधिया देखील मेले असते

..तर संजय गांधींसोबत विमान अपघातात माधवराव सिंधिया देखील मेले असते

संजय गांधी हे भारतीय राजकारणाच्या इतिहासातील असे नाव आहे, जे आपल्या बेदरकार व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की संजय गांधींचा गतिमानतेवर फार विश्वास होता. ज्या गतीने ते राजकारणात आले, ज्या गतीने त्यांनी राजकारणाची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली आणि ज्या गतीने त्यांनी आपले राजकीय निर्णय प्रत्यक्षात उतरवले; तीच गती शेवटी त्यांच्या मृत्यूचे कारण देखील बनली. एका विमान अपघातात संजय गांधींचे निधन झाले.

संजय गांधी यांना स्पोर्ट्स कार आणि त्यांची गती फार आवडायची. पण आपल्या भावाला विमानं चालवताना पाहून त्यांनाही अधूनमधून पायलट व्हावंसं वाटायचं. जिद्दीने त्यांनी पायलंटचे प्रशिक्षण घेतले आणि १९७६ साली कमी वजनाची विमानं उडवण्याचे लायसन्स देखील मिळवले. हवेत विमानाची कसरत करणे हा त्यांचा आवडता छंद होता, त्या खेळात त्यांनी बक्षिसेही जिंकली होती. आणीबाणीनंतर जनता सरकारने त्यांचे लायसन्स रद्द केले होते. मात्र पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर संजय गांधींनी आपले लायसन्स परत मिळवले.

त्याकाळी पिट्स S2A हे अमेरिकेचे दोन आसनी विमान हवेतील कसरतींसाठी प्रसिद्ध होते. इंदिरा गांधींचे धार्मिक श्रद्धास्थान असणाऱ्या धीरेंद्र ब्रह्मचारी यांना हे विमान पाहिजे होते. पण कस्टम विभाग या विमान आयातीसाठी परवानगी देत नव्हता. इंदिरा गांधी सत्तेत परतल्यानंतर कस्टम विभागाने या विमानाच्या आयातीला हिरवा कंदील दाखवला. विमान भारतात आले. दिल्लीच्या फ्लाईंग क्लबमध्ये त्याला ठेवण्यात आले. ही बातमी समजताच संजय गांधी वविमानाचे उड्डाण भरण्यासाठी त्याठिकाणी पोहोचले, पण क्लबच्या तज्ञ पायलट्सनी आधी विमान हवेत उडवून त्याची चाचणी घेतली.

२१ जून १९८० रोजी पहिल्यांदा पिट्स विमान संजय गांधींच्या हातात देण्यात आले. २२ जूनला पत्नी मनेका, इंदिराजींचे पीए आर.के.धवन आणि पिट्स विमानाची उत्सुकतेने वाट पाहणारे धीरेंद्र ब्रह्मचारी यांना घेऊन ४० मिनिटे संजय गांधींनी दिल्लीच्या आकाशात विमान फिरवले. त्यानंतर ते घरी आले. संध्याकाळ झाली होती. घरी इंदिरा गांधींसोबत माधवराव सिंधिया चर्चा करत बसले होते. संजय गांधींनी माधवरावांना सांगितले उद्या सकाळी तुम्हाला माझ्यासोबत पिट्स विमानात बसून दिल्लीची सैर करायची आहे. दोघांमध्ये सकाळची वेळ ठरली.

२३ जून १९८० ची सकाळ उजडली. संजय गांधी आवरुन सफदरजंग विमानतळावर पोहोचले. बराच वेळ माधवराव शिंदेंची वाट पाहत ते थांबले, पण माधवरावांना यायला उशीर झाला. तोपर्यंत संजय गांधींनी विमानतळावरील सुभाष सक्सेना नावाच्या पायलटला सोबत घेऊन विमान आकाशात भिरकावले.

थोड्या वेळाने हवाई कसरती करताना विमान संजय गांधींच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि खाली कोसळले. या अपघातात त्यांचा आणि सोबत असणाऱ्या पायलटचा मृत्यू झाला. असं सांगितले जाते की संजय गांधीं विमान चालवताना कोल्हापुरी चपला घालायचे, त्यामुळेच त्यांचा अपघात झाल्याचे आरोपही झाले.

संजय गांधी यांनी ठरवलेल्या वेळेवर पोहोचायला उशीर झाला म्हणून माधवराव शिंदे हे विमान अपघातातून बचावले खरे. परंतु काळाला मात्र त्यांचे हे वाचणे मान्य झालं नसेल. कदाचित त्यामुळेच २१ वर्षानंतर म्हणजेच २००१ साली दिल्लीवरुन कानपूरला सभा घेण्यासाठी जात असताना उत्तरप्रदेशातील मैनपुरी भागात त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *