झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज आणि मॉडेल हितेशा वादात रोज नवीन माहिती समोर येत आहे. हितेशाने कामराजवर अनेक आरोप केले होते. सुरुवातीला या प्रकरणात कामराजची चुकी असू शकते असे वाटत होते. पण नंतर जसं जसं प्रकरण वाढत गेलं तसं हितेशाच्या आरोपांची पोलखोल होत गेली.
नेटकऱ्यानी सुरुवातीपासूनच कामराजला साथ दिली होती. आता तर नेटकऱ्यांनी एक असा पुरावा वायरल केलाय जो बघून हितेशा किती खोटं बोलत आहे याचा अंदाज येतो. हितेशा ने सुरुवातीला जेव्हा एक व्हिडीओ पोस्ट करून घटनेची माहिती दिली होती. त्याच व्हिडिओच्या आधारे तिची पोलखोल नेटकऱ्यानी केली आहे.
हितेशाचे दोन व्हिडीओ समोर ठेवत नेटकऱ्यांनी सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हितेशाच्या खो टारडेपणाचा दावा करताना देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हितेशा खोटं बोलत असल्याचं स्पष्ट दिसतं. हितेशाचा दुसरा व्हिडीओ हा तिने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा आहे.
हितेशाने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या उजव्या हातावर जखम झाल्याचं सांगितलं आहे. कामराजकडूनच हि जखम झाल्याचा दावा तिने केला. या मुलाखतीच्या व्हीडीओमध्ये हि जखम स्पष्ट दिसते. पण नेटकऱ्यानी हितेशाच्या पहिल्या व्हिडीओ मध्ये हि जखम नसल्याचा पुरावाच वायरल केला आहे.
हितेशाने जेव्हा घटना घडली तेव्हा शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या हातावर कुठलीही जखम नसल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे ही तरुणी माध्यमांना मुलाखत देताना खोटं बोलली असा निष्कर्ष नेटकऱ्यांनी काढला आहे.
बघा व्हिडीओ-