महिलांना प्रत्येक महिन्यामध्ये पीरियड्सच्या समस्याला सामोरे जावे लागते परंतु ही समस्या तेव्हा अधिक होते जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न असते. लग्नाच्या दिवशी काय करायला पाहिजे ? आज आपण या लेखामध्ये तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत ,यामुळे तुम्हाला या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी खूप मोठी मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल
लग्नाच्या विधी परंपरासाठी तुम्हाला तासन तास बसून राहावे लागू शकते. असे होऊ शकते की या सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला पॅड परिधान करणे तुम्हाला कम्फर्ट वाटणार नाही आणि पॅड काही तासांमध्ये नरम सुद्धा होऊन जाईल म्हणून टैम्पूनचा वापर करा.
हे वापरण्यास अधिक सोपे आणि चांगले राहील. टैम्पून वापरल्यावर तुम्हाला कम्फर्ट वाटत नसेल तर अशावेळी दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या पॅडचा वापर करा. हा सुरक्षित पर्याय आहे आणि यामुळे तुमचा लेहंगा डाग मुक्त राहिल.
पीरियडसच्या दरम्यान अधिक तर मुलींना पायांमध्ये, कंबर , पोट आणि पार्श्व भागांमध्ये वेदना होऊ लागतात म्हणून वेदना पासून वाचण्यासाठी कमी हिल वापरा. पीरियडस च्या दरम्यान पोटामध्ये वेदना होण्याची समस्या असल्यास लग्नाच्या दिवशी या वेदनेपासून मुक्तता मिळवण्यासाठी एखादी पेनकिलर गोळी सोबत ठेवा कारण जीवनातील सर्वात महत्वपूर्ण दिवस तुम्ही वेदनामुक्त आणि आनंदाने पार पाडू शकाल.
खरंतर अशा प्रसंगी पुन्हा पुन्हा उठून जाणे थोडे कठीण असते कारण सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असतात. तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा मैत्रिणीला सांगू शकाल कि काही ना काही कारण सांगून वारंवार बाथरूम मध्ये नेण्यास सांगावे.
पीरियडस दिवसांमध्ये पिंपल्स बाहेर येणे साधारण गोष्ट आहे यासाठी तोंडाला टूथपेस्ट क्रीम लावून तुम्ही वेदना कमी करू शकतात किंवा तेव्हा चेहऱ्यावर बर्फ लावून ठेवू शकता, याशिवाय तुम्ही फाउंडेशनच्या मदतीने पिंपल्स लपविण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतात.