सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसाची जीवनशैली एवढी बदलली आहे कि माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. वेळेसोबत माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसं तर सर्वच आजार हे धोकादायक आणि हानिकारक असतात. पण या सर्व आजारांमध्ये कँसर हा खूप जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचं नाव घेतलं कि मनात भीती निर्माण होते.
कँसर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. तोंडाचा देखील कँसर असतो ज्याला ओरल कँसर देखील म्हंटले जाते. तोंडाच्या कॅन्सरचे जास्त पेशंट हे भारतातच सापडतात. याचे कारण म्हणजे भारतात लोक जास्त प्रमाणात गुटखा, तंबाखू आणि इतर पदार्थांचं सेवन करतात.
तोंडाचा कँसर हा या गोष्टींचे सेवन करणाऱ्या लोकांनाच होतो असे काही नाही. तो कोणाला देखील होऊ शकतो. तोंडाचा कँसर झाल्यास सुरुवातीला त्याचे काही सामान्य लक्षणं दिसतात. आज आपण जाणून घेऊया तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय असतात? कोणाला जास्त या कॅन्सरचा धोका असतो? आणि यापासून बचावासाठी काय करावे?
तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे-
तोंडात पांढरे फोड येणे किंवा छोटे मोठे जखमा होणे हे कॅन्सरची सुरुवात असू शकते. तोंडात जर जास्त वेळ पांढरा फोड, जखम किंवा छाला जास्त वेळ राहिला तर तोंडाच्या कॅन्सरची समस्या उदभवू शकते.
काही खाण्यास अडचण येते, तोंडातून दुर्गंधी येते, आवाजात बदल होतो, आवाज बसतो हे कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण आहेत. तोंडातून जास्त लाळ गळत असेल तर किंवा रक्ताची लाळ येत असेल तर तोंडाचा कँसर होऊ शकतो.
कोणाला आहे या कॅन्सरचा जास्त धोका?
कमजोर इम्युनिटी मुळे देखील त्या कॅन्सरचा धोका उदभवू शकतो. तोंडाची नीट साफ स्वछता ठेवली नाही तर तोंडाचे रोग होऊन कॅन्सर होऊ शकतो. जे लोक गुटखा, पान मसाला, सुपारी, तंबाखू सारख्या गोष्टींचे सेवन करतात त्यांना या कॅन्सरचा अधीक धोका असतो. बिडी, सिगारेट, दारू गां जा आदींचे सेवन करणार्यांना देखील हा धोका असतो.
यापासून बचावासाठी काय कराल?
जर तुम्हाला तोंडाच्या कॅन्सरपासून वाचायचं असेल तर धूम्रपान आणि नशांपासून दूर राहिल पाहिजे. तुम्ही तुमच्या तोंडाची रोज साफसफाई करा. दात आणि तोंडाची रोज दोन वेळा तरी स्वछता करा. जर दात, हिरड्या यामध्ये काही बदल दिसले तर डॉक्टरांना तात्काळ भेटा. कोल्ड ड्रिंक, बंद डब्यातील पदार्थ, जंक फूड सारख्या गोष्टींचे सेवन करू नका. जर तुम्ही फळ, सलाड, भाज्यांचे सेवन करत असाल तर त्या आधी स्वच्छ धुवून घ्या.