देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे एक प्रचंड लोकप्रियता असलेले नेते होते. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अटलजींना प्रत्येक समाजातील प्रत्येक घटक खूप मानायचा. भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे मोठे नेते असताना त्यांना मानणारा मुस्लिम वर्ग देखील मोठा होता.
अटल बिहारी वाजपेयी हे १० वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत नेहमी विजयच मिळवला असे नाही. त्यांना पराभवाचा देखील सामना लोकसभा निवडणुकीत करावा लागला होता. अटलजी लखनौ मतदारसंघातून ७ वेळा निवडून आले होते. पहिल्यांदा ते येथून १९५४ मध्ये, दुसऱ्यांदा १९५७ मध्ये आणि नंतर १९९१ पासून २००४ पर्यंत सलग ५ वेळा निवडून आले.
१९९१ मध्ये जेव्हा अटलजी लखनौ मधून निवडणूक लढवणार होते तेव्हा भाजपचे नेते आसिफ ऐजाज़ रिजवी हे ते व्यक्ती होते ज्यांनी अटलजींच्या नामांकनाचे कागदपत्र तयार केले होते. या कागदपत्रांमध्ये उत्पन्न, घर आणि गुन्ह्यांची माहिती द्यावी लागते. १९९१-९२ मध्ये उत्तर प्रदेश सरकारमध्ये एजाज मंत्री देखील होते. एजाज हे अटलजींपेक्षा वयाने लहान होते.
आज एजाज यांचा मुलगा त्यांचा वारसा चालवत आहे. एजाज यांच्या नावाने कॉलेज देखील आहे. एजाज यांची मुलगी शिमा रिजवी या देखील राजकारणात आल्या होत्या. २००९ मध्ये शिमा विधान परिषद सदस्य बनली होती. २००९ मध्ये तीच निधन झालं.
एजाजच्या मुलाने अटलजींचा एक किस्सा सांगितला होता. तेव्हा अटलजी त्यांच्या सरकारी बंगल्यावर यायचे. एकदा ते ईद-मिलनच्या कार्यक्रमाला आले होते. काही वेळांनंतर त्यांनी एजाजला जवळ बोलावले. आणि कानात टॉयलेटला जायचं म्हणून सांगितलं. एजाज अटलजींना टॉयलेटला घेऊन गेला.
अटलजी टॉयलेटला गेल्यावर एजाज त्यांना कोणी डिस्टर्ब करू नाही म्हणून दरवाजाच्या बाहेर उभा राहिला. जेव्हा अटलजी बाहेर आले तेव्हा त्यांनी एजाजला उभा असलेला बघितल. त्यांना ते खूप आवडलं. त्याची माणुसकीची भावना आणि प्रेम यातून दिसून आली होती. तेव्हापासून अटलजींचे आणि एजाजचे नाते खूप घट्ट झाले. अटलजींना एजाज त्यानंतर कधीही हक्काने जाऊन इदी मागत असे. अटलजीही खुशीने इदी देत असत. अटलजींचे हे वर्तन त्यांच्या लोकप्रियतेचे कारण दाखवून देते.