Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / दवाखान्याबाहेर तरफडणाऱ्या रुग्णांना मोफत ऑक्सिजन देणाऱ्यावरच दाखल केला FIR

दवाखान्याबाहेर तरफडणाऱ्या रुग्णांना मोफत ऑक्सिजन देणाऱ्यावरच दाखल केला FIR

सध्या देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन वाचून आपले प्राण गमवावे लागले आहेत, लागत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना ना बेड मिळत आहेत ना गोळ्या औषधी. रुग्णालयाबाहेर लोकं नंबर लावून बेड रिकामे व्हायची वाट बघत आहेत. एका बेडसाठी १००-१०० लोक वेटिंगवर असल्याचं चित्र आहे.

सरकारी रुग्णालयाबाहेर तर लोक रस्त्यावर उपचार घेत आहेत. अनेक जण रस्त्यावरच आपले प्राण सोडत आहेत. पण अशा संकटात एका व्यक्तीने गरजु रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर दिले. पण प्रशासनानं त्या व्यक्तीवरच FIR दाखल केली. या व्यक्तीवर आरोप ठेवण्यात आला कि तो स्वतःचा प्रचार करत आहे आणि सरकारची प्रशासनाची प्रतिमा मालिन करत आहे. आता लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या व्यक्तीवर जर प्रशासन स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी कारवाई करत असेल तर हे लज्जास्पद आहे असेच म्हणावं लागेल.

हि घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात. २९ एप्रिल रोजी सरकारी दवाखान्याबाहेर लोक अक्षरशः ऑक्सिजन वाचून तरफडत होते. त्यावेळी या लोकांसाठी देव बनून धावून आला विकी नावाचा एक व्यक्ती. हा विकी एक खासगी ऍम्ब्युलन्स चालवतो. त्याच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर होते. त्या सरकारी रुग्णालयात बेड रिकामे नसल्याने लोकांना वापस काढून देण्यात येत होतं. बरेच लोक रुग्णालयाच्या बाहेरच झोपले. त्यांची परिस्थिती बघून विकीला राहवलं नाही आणि त्यांना मदत करावी असं त्याला वाटलं.

तो आपल्या ऍम्ब्युलन्स मधील ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आला आणि ज्या लोकांना गरज होती त्यांना वाटू लागला. यासाठी त्याने ना कोणाकडून पैसे घेतले ना इतर काही मागितलं. विकी हा कोणी समाजसेवकही नाही किंवा ना तो एखाद्या संस्थेसोबत काम करतो. पण त्याला परिस्थिती बघून लोकांची मदत करावी वाटली आणि त्याने ती केली. त्याला मदत करताना बघून लोकांनी त्याचे फोटो काढले व्हिडीओ बनवले. त्याची सर्वत्र खूप प्रशंसा झाली. विकीने जवळपास ३० लोकांना ऑक्सिजन दिले. विकीच्या मते पैसे कधी पण कमवता येतील पण लोकांचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे.

विकीने लोकांना मदत केल्यानंतर त्याची बातमी रुग्णालयाच्या मध्ये देखील पोहचली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अधिकारी नाराज झाले. त्यामुळे ३० एप्रिलला मुख्य आरोग्य अधिकारीने पोलिसात विकिविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी देखील कुठलीही खातरजमा न करता विकिविरुद्ध आरोग्य कर्मचाऱ्याविरुद्ध हिंसा करण्यासाठी उकसवल्याचा आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याशिवाय सरकारी आदेश न पाळल्याचे आणि संक्रमण पसरवल्याचे कलम देखील लावले. आता लोकांना मदत करून विकीने काय गुन्हा केला हा प्रश्न पडला आहे.

या घटनेबाबत आजतकला बोलताना विकीने म्हंटले कि मी काय चूक केले हे मला माहिती नाही. मी न कोणाकडून पैसे घेतले न काही चुकीचं केलं. अमर उजालाच्या बातमीनुसार डॉक्टर अनिल शर्मा यांनी सांगितले कि एक युवक रुग्णांना अवैधपणे झोपवून ऑक्सिजन देत होता. त्याला न कुठला अधिकार होता न त्याच्याकडे काही डिग्री होती. हि लोकांच्या जीवांसोबत धोकादायक बाब होती. रुग्णालयाची प्रतिमा खराब करण्यासाठी असं केल्याचा आरोप रुग्णालयाने केला आहे.

आता विकीने लोकांचे प्राण वाचवून नेमकं कशी रुग्णालयाची प्रतिमा मालिन केली असा प्रश्न येथे पडला आहे. पोलिसांनी याविषयी म्हंटले आहे कि मुख्य आरोग्य अधीक्षक जौनपूर यांनी आम्हाला तक्रार दिली. विकी नामक व्यक्ती कोविड टेस्ट न करता, असुरक्षितपणे, सॅनिटाईज न करता आणि सावधानता न बाळगता ऑक्सिजन लावत होता. यामुळे लोकांमध्ये संक्रमण पसरू शकते. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन विकीवर गुन्हा दाखल झाला आहे.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *