Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / दहावीला ४४ टक्के मार्क पडले म्हणून रडत न बसता तो आज कलेक्टर बनलाय!

दहावीला ४४ टक्के मार्क पडले म्हणून रडत न बसता तो आज कलेक्टर बनलाय!

आपल्या देशात शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या मार्कांना जरा जास्तच महत्व दिले जाते. दहावी आणि बारवीमध्ये चांगले मार्क पडले तरच तो विद्यार्थी पुढे काही यश मिळवू शकतो असा समज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मार्कच तुम्ही किती हुशार आहेत हे दाखवू शकत नाहीत. त्यासाठी तुमच्यामध्ये असलेली कठोर परिश्रम करण्याची जिद्द तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन होऊ शकते. दहावीला ४४ टक्के पडूनही कलेक्टर पदाला गवसणी घालणाऱ्या अवनीश शरण यांनी हे दाखवून दिलं आहे. अवनीश शरण यांचा जीवनप्रवास हा कमी मार्क पडले म्हणून हार मानणाऱ्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

अवनीश शरण यांचं आयुष्य खरंच खूप प्रेरणा देणारं आहे. अवनीश शरण हे सर्वप्रथम तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी आपली मुलगी वेदिकाचं ऍडमिशन प्रायव्हेट इंग्लिश स्कुलमध्ये न करता एका सरकारी शाळेत केलं होतं. ते लोकांना चांगल्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. २० जानेवारी १९८१ रोजी बिहारमध्ये जन्मलेले अवनीश आज एक लोकप्रिय IAS अधिकारी आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी कलेक्टर पदाला गवसणी घातली आहे. ते समस्तीपूर जिल्ह्यातील केवटा गावचे रहिवाशी आहेत.

बिहारमध्येच अवनीशने आपले शालेय शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. गावातील सरकारी शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. अवनीश यांचं शालेय जीवनात अभ्यासात जास्त लक्ष नव्हतं. त्यांना दहावीमध्ये फक्त ४४ टक्के पडले. तर बारावीत यामध्ये सुधारणा होऊन ६५ टक्के मार्क मिळाले. पदवीला देखील अवनीश फक्त ६० टक्के मार्क घेऊन पास झाले होते. पण म्हणतात ना एक परीक्षा तुमची गुणवत्ता ठरवू शकत नाही. अवनीशने UPSC ची खूप परिश्रम घेऊन तयारी केली.

अवनीशने मिथिला यूनिवर्सिटी मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर इलाहाबाद आणि दिल्ली येथे ते पुढील शिक्षणासाठी आले. अवनीशच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरी कधी लाईट नसायची तर त्यांनी दिव्याच्या प्रकाशात देखील अनेकदा अभ्यास केला. अवनीशहा लहानपणी गावात येणाऱ्या IAS अधिकाऱ्यांना बघून प्रेरित व्हायचा.

अवनीशने त्या अधिकाऱ्यांना बघूनच UPSC करण्याचं मन बनवलं. त्याच्या प्रयत्नांचे फळ मिळाले २००९ मध्ये. अवनीशने यूपीएससीची एवढी तयारी केली होती कि ते देशात ७७ वि रँक मिळवत पास झाले. ते सध्या छत्तीसगढ कॅडरचे अधिकारी म्हणून काम बघत आहेत. अवनीश अभ्यासात कमी पडायचा पण त्याला आत्मविश्वास खूप होता. वडिलांचे परिश्रम बघून तो प्रभावित व्हायचा.

अवनीश आज सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. ते युवकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ते युवकांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. अवनीश हे फक्त एक चांगले भाषण देणारे अधिकारी नाही तर ते आपल्या कृतीतून देखील ते किती उच्च विचाराचे आहेत हे दाखवून देतात. कारण एवढा मोठा अधीकारी आपल्या मुलीला सरकारी शाळेत शिकवतो व पत्नीची डिलिव्हरी देखील सरकारी हॉस्पिटल मध्ये करतो. ते लोकांना मदत करण्यासाठी आपला नंबर सोशल मीडियावर नेहमी देतात ज्यामुळे लोक त्यांना थेट संपर्क करू शकतील.

अवनीश हे जेव्हा एखादा मोठ्या परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी काही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून आपल्या कमी मार्क असलेल्या मार्कशीटचा फोटो सोशल मीडियावर टाकतात. विद्यार्थ्यांना ते सांगतात की कमी मार्क असले म्हणजे अपयश आलं असं नाही. अवनीशला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. लोकांच्या मदतीसाठी नेहमी हजर असणाऱ्या अवनीश यांचा पंतप्रधान मोदी यांनी देखील एकदा सन्मान केला होता.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *