दिशा पाटनी हि बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींनपैकी एक आहे. दिशाने हळू हळू बॉलिवूडमध्ये आपले नाव मोठे केले असून तिने चांगली पकड मिळवली आहे. दिशाने आजपर्यंत अनेक मोठ्या सिनेमांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. दिशा हि नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. दिशा पाटनीने मागील वर्षी मलंग या सिनेमात आदित्य रॉय कपूर सोबत भूमिका निभावली होती.
दिशा पाटनी यापूर्वी एम एस धोनी, बागी, भारत या मोठ्या सिनेमातून आपल्या भेटीला आली आहे. दिशा हि सिनेमाव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. अभिनयाशिवाय तिला फिटनेसची देखील खूप आवड आहे. ती नेहमीच वेगवेगळे फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
दिशाच्या फिटनेस आणि अभिनयाचे, सौंदर्याचे तुम्ही चाहते असाल पण तुम्हाला सांगू इच्छितो कि दिशाची बहीण देखील सुंदरतेचा बाबतीत कुठेही मागे नाहीये. खुशबू पाटनी दिशापेक्षा मोठी आहे पण तिचा फिल्मी दुनियेशी संबंध नाहीये.
सैन्यात लेफ्टनंट आहे खुशबू, भारतीय सैन्यात करते देशसेवा-
खुशबू हि सैन्यात लेफ्टनंट आहे. भारतीय सैन्यात ती लेफ्टनंट पदावर राहून देशसेवा करत आहे. सैन्यात असल्याने तिची फिटनेस पण खूप चांगली आहे. ती देखील व्यायाम करतानाचे तिचे व्हिडीओ शेअर करत असते. इंस्टाग्रामवर खुशबूचे १ लाख ५० हजार फॉलोवर्स देखील आहेत. खुशबू तिच्या इंस्टाग्रामवर वर्दीतले फोटो देखील शेअर करत असते.
दिशा आणि खुशबू पाटनी यांचे वडील जगदीश सिंह हे देखील पोलीस असून ते डीएसपी दर्जाचे अधिकारी आहेत. दिशा देखील आपल्या कुटुंबासोबतचे व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.
दिशा आणि खुशबू यांचं घर बरेली मध्ये आहे. खुशबूने मागे एकदा एक कठीण व्यायाम करतानाच व्हिडीओ शेअर केला होता. यावर टायगर श्रॉफने देखील कमेंट केली होती. टायगरने लिहिले होते क्या बात है खुशबू. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. खुशबू हुबेहूब आपली छोटी बहीण दिशा सारखी दिसते. त्यांना सुर्यांश हा एक भाऊ देखील आहे.