मेळघाटमधील बहुचर्चित दीपाली चव्हाण प्रकरण अजून महाराष्ट्र विसरला नसेल. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठानी दिलेल्या त्रासामुळे जगाचा निरोप घेतला होता. दिपालीने एक पत्र लिहिले होते ज्यामध्ये तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. तिने उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विनोद शिवकुमारला अटक झाली होती.
दिपालीने तिचे वरिष्ठ अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांना पत्र लिहून न्याय मागितला होता. पण दिपालीने अनेकदा मागणी करूनही तिला न्याय न मिळाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेनंतर रेड्डीला देखील अटक करा हि मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. रेड्डी यांचं फक्त त्यावेळी निलंबन करण्यात आलं होतं. श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी सुरु होती. दरम्यान आता या घटनेत मोठी घडामोड घडली असून श्रीनिवास रेड्डी यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील प्रमुख आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला आधीच अटक झाली होती. रेड्डी यांच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणात मागणी झाली होती. अटकेसाठी आंदोलन देखील झाले होते.
रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्या लेडी सिंघम अशी हरिसाल मध्ये त्यांची ओळख होती. शिवकुमार हा वारंवार दीपालीला निंलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी द्यायचा. अनेकवेळा सर्वांसमोर शि व्या दिल्या असल्याचंही दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हंटलं होतं. शिवकुमार दीपालीला नेहमी नियमबाह्य कामं करायला भाग पाडायचा. तूझ्यावर अॅस्ट्रॉ सिटीचा गु न्हा दाखल करु आणि चार महिने जेलमध्ये पाठवू अशी ध मकी दीपालीला शिवकुमारने दिली होती.
या प्रकरणाचे रेकॉर्डिंग त्यांनी खासदार नवनीत राणा यांना देखील ऐकवलं होतं. शिवकुमार याने आपल्याला सातत्याने मानसिक त्रास दिला असल्याचं दिपालीने पत्रात म्हंटलं होतं. वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांनी वेळीच काही पाऊल उचलले असते तर पुढील घटना घडली नसती अशी चर्चा नंतर झाली होती. त्यामुळे रेड्डीला देखील अटक करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. आता या अटकेमुळे दीपालीला खरा न्याय मिळणार आहे.
कोण होत्या दीपाली चव्हाण?
अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी अशी दीपाली चव्हाण यांची ओळख होती. त्या लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध होत्या. दीपाली चव्हाण या मूळच्या मराठवाड्यातल्या होत्या. २०१५ मध्ये दीपाली यांनी महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत यश मिळवलं होतं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या.
दीपाली चव्हाण यांचं सासर अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी हे होतं. त्यांचे पती राजेश मोहिते हे अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाल्यांनंतर दीपाली खूप खूष होत्या.