RFO दीपाली चव्हाण यांच्या प्रकरणात सुरुवातीला विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याचे नाव समोर आलं होतं. तर मुख्य वनसंरक्षक रेड्डी याने देखील दिपालीच्या पत्राची दखल घेतली नाही म्हणून त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी होत होती. सुरुवातीला दिपालीने एम एस रेड्डी याना लिहिलेल्या पत्रातून सर्व खुलासे झाले होते.
मूळच्या मराठवाड्यातील असलेल्या दीपाली चव्हाण यांचं अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी हे सासर होतं. त्यांचे पती राजेश मोहिते हे अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पोस्टिंग दीपालीला मिळाली होती.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी अशी दिपाली चव्हाण यांची ओळख होती. लेडी सिंघम म्हणून देखील त्यांना ओळखले जायचे. दरम्यान दिपालीचे पतीला लिहिलेले दुसरे पत्र समोर आले होते ज्यातून एक नवीन नाव समोर आले होते. हे नाव होते मनीषा उईके. या पत्रात दिपालीने लिहिले होते मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. तिने माझे आयुष्य बरबाद केलं आहे.
या नावाचा उल्लेख झाल्याने ती कोण आहे हा प्रश्न सर्वाना पडला होता. या मनीषाची माहिती आता समोर आली आहे. मनीषा उईके हि मांगिया गावातील एक महिला आहे. दीपालीला ज्या अ ट्रोसिटीचा त्रा स शिवकुमार देत होता त्या अ ट्रोसिटीची फिर्यादी मनीषा उईके असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच दिपालीने मनिषाबद्दल असं पत्रात लिहिलं आहे.
दीपाली कार्यरत असलेल्या हरिसाल मधील मांगिया या गावाचं पुनर्वसन झालं होतं. चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव जवळ हे पुनर्वसन झालं होतं. या गावच्या शेतजमिनी वनविभागाने ताब्यात घेतल्या होत्या. अगदी सातबारावर देखील याची नोंद झाल्याचे दिसते. पण पुनर्वसन झाल्यानंतर देखील अनेक ठिकाणी जुने मालक असलेले शेतकरी त्या जमिनी वापरतात असे अनेकदा आपण बघितले आहे.
इथेही काही आदिवासींनी त्या शासकीय जमिनीवर पीकपेरणी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी दिपालीने त्या ठिकाणी जाऊन आदिवासींना मज्जाव केला होता. यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष झाला होता. वनकर्मचाऱ्यांना गावकर्यांनी ओलीस देखील ठेवलं होतं. या संघर्षानंतरच मांगिया मधील मनीषाला विनोद शिवकुमार ने ऍट्रॉ सिटी दाखल करण्यास प्रोत्साहित केले होते. तसा उल्लेखही रेकॉर्डिंग मध्ये होता.
मनीषा फिर्यादी असल्यानेच दिपालीने तिचा उल्लेख पत्रात केल्याचं दिसत आहे. शिवकुमार सोबतच मनीषा देखील या प्रकरणात दोषी दिसत आहे.