Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / दीपाली चव्हाण प्रकरणात संजय राठोडही जबाबदार? आ. रवी राणा यांनी समोर आणलं ते पत्र!

दीपाली चव्हाण प्रकरणात संजय राठोडही जबाबदार? आ. रवी राणा यांनी समोर आणलं ते पत्र!

संजय राठोड हे नाव पूजा चव्हाण मृ त्यू प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात ढवळून निघालं. पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्याने वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देऊन आता अनेक दिवस उलटले आहेत. पण नुकतेच झालेल्या दीपाली चव्हाण प्रकरणात देखील खा. नवनीत राणा यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं आहे.

वनअधिकारी दीपाली चव्हाण या हरिसाल मध्ये कार्यरत होत्या. त्यांना वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार याच्याकडून द बाव आणि मानसीक त्रा स सहन करावा लागत होता. अनेकदा रात्री बे रात्री त्यांना कामावर तो बोलवायचा. दीपाली या सर्व त्रा सामुळे व्यथित झाल्या होत्या. त्यांनी वरिष्ठ अधिकारी रेड्डीकडे आपल्याला होत असलेल्या त्रा साची तक्रार केली.

वारंवार तक्रार करून दिपालीचा त्रा स काही कमी झाला नाही. याउलट तो वाढतच गेला. अखेर दिपालीने न्याय मागण्यासाठी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. एक महिला खासदार म्हणून त्या आपल्याला मदत करतील असं तिला वाटलं. नवनीत राणांकडे गेल्यावर दिपालीने सर्व पुराव्यानिशी त्यांना माहिती दिली.

खा. नवनीत राणा यांच्या पतींना देखील दीपाली भेटल्या. आ. रवी राणा यांनी देखील दिपालीच्या बदलीसाठी प्रयत्न केले. त्यांनी थेट वनमंत्र्यांना दिपालीच्या बदलीसाठी ४ वेळा कॉल केला. वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाकडून हो बदली करू अशी उत्तरे मिळाली. पण बदली काही झाली नाही.

एवढच नाही तर आ. रवी राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना एक पत्र लिहून दिपालीच्या बदलीची शिफारस केल्याचे म्हंटले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. राठोड यांनी या बदलीकडे दुर्लक्ष केल्याचा आ रोप राठोड यांच्यावर होतोय.

संजय राठोड यांनी मात्र राणा यांच्याकडून कुठलंही पत्र आपल्याला मिळालं नसल्याचं म्हंटल आहे. शिवकुमार याच्या कामाच्या तक्रारी मात्र होत्या असे ते म्हणाले. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्याच्या बदलीसाठी पाठपुरावा देखील केला होता असे राठोड म्हणाले.

कोण आहेत दीपाली चव्हाण-

दीपाली चव्हाण या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हरिसाल मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. २०१५ मध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत त्यांनी यश मिळवलं होतं. २ वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह राजेश मोहिते यांच्यासोबत झाला होता.

राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथील रहिवाशी होते. ते देखील शासकीय सेवेत असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे सेवेत आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आई देखील सोबत राहायच्या.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *