Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / दुःखाचा डोंगर कोसळल्याने चहलची पत्नी धनश्री राहतेय सध्या सोशल मीडियापासून दूर!

दुःखाचा डोंगर कोसळल्याने चहलची पत्नी धनश्री राहतेय सध्या सोशल मीडियापासून दूर!

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल हा मागील वर्षी धनश्री वर्मा या युटूबर सोबत विवाहबंधनात अडकला. धनश्री हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे वेगवेगळ्या क्रिकेटपटू सोबत डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. युट्युब शिवाय इंस्टाग्रामवर देखील ती नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांचा तिच्याकडे नेहमीच लक्ष असतं. पण सध्या धनश्री सोशल मीडियापासून दूर असल्याचे दिसत आहे.

मागील अनेक दिवसांपासून धनश्रीचा नवीन व्हिडीओ आलेला नाहीये. तर सोशल मीडियावर देखील ती खूप कमी दिसते. अनेक दिवसांपासून एकही पोस्ट तिने केलेली नाहीये. चाहते यामुळे चिंतेत पडले होते. सध्या कोरोनाचा हाहाकार सुरु असल्याने चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. तिच्या जुन्या पोस्टवर अनेक जण कमेंट करून तिच्या प्रकृतीविषयी विचारणा करत होते. चाहत्यांची चिंता बघून धनश्रीने सोशल मीडियापासून दूर असण्याचे कारण सांगितले आहे.

इंस्टाग्राम स्टोरीमधून धनश्रीने आपल्या समस्यांचा खुलासा केला आहे. धनश्री सध्या खूप कठीण काळातून जात आहे. सोशल मीडियापासून दूर राहण्यामागे एक कारण असल्याचं तिने स्टोरीमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे डान्सचे नवीन व्हिडीओ येत नाहीयेत असं धनश्रीने म्हंटल आहे.

धनश्रीने स्टोरीमध्ये लिहिलं आहे कि एप्रिल आणि मे महिना तिच्यासाठी खूप कठीण होता. अनेक आव्हानांचा सामना तिने यादरम्यान केला. धनश्रीच्या आईला आणि भावाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा धनश्री आयपीएलच्या बायोबबल मध्ये होती. त्यामुळे तिला आईला आणि भावाला या संकटाच्या वेळी काहीच मदत करता आली नाही. कुटुंबापासून दूर राहणं खूप कठीण असल्याचं तिने म्हंटले आहे.

धनश्रीचे आई आणि भाऊ कोरोनामधून बरे होऊन घरी आले असले तरी तिच्या कुटुंबात एक दुःखाचा धक्का बसला आहे. धनश्रीच्या काकीचे मात्र कोरोनाने निधन झाले आहे. धनश्रीचे हे दुःख संपते नाही तोपर्यंत तिचे सासरे म्हणजे युजवेंद्र चहलचे वडील कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर सासू देखील क्वारंटाईन झाल्या आहेत. धनश्रीचं यादरम्यान रुग्णालयात जाणं झालं. रुग्णालयातील स्थिती बघून तिला धक्का बसल्याचे तिने म्हंटले आहे.

धनश्रीने या स्टोरीच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन देखील केले आहे. शिवाय सर्वानी घरी राहून आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे तिने म्हंटले आहे. कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालेला असताना डान्सचे व्हिडीओ पोस्ट करणे योग्य नसल्याने ती सध्या सोशल मीडियापासून दूर आहे असे तिने म्हटलंय. “मी लवकरच पुन्हा नव्यानं कामाला लागेन आणि कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला एकत्र मिळून लढावी लागणार आहे”, असं आवाहन धनश्रीनं केलं आहे. धनश्रीने शेवटची पोस्ट मदर्स डे ला केली होती. त्यानंतर तिने एकही पोस्ट केली नाही.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *