भारतात सहसा प्रत्येक भागात वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार पिकं येतात. अनेक औषधी पीक देखील मोठ्या प्रमाणात देशात पिकवली जातात. याच औषधी पिकांमध्ये आता एका नवीन पीक आले आहे. हा पदार्थ आपल्यासाठी जुनाच आहे मात्र याचे उत्पन्न भारतात घेतले जात नव्हते. हा पदार्थ आहे औषधी गुणांनी युक्त आणि प्रत्येक घरात आढळणारं हिंग.
जगात उत्पादित होणाऱ्या एकूण हिंगाच्या निम्मा हिंग तर भारतातच खपतो. हिंगाची शेती भारतात याआधी कधी झाली नाही. पण आता मात्र तो क्षण आला आहे. भारतात हिंगाच्या पहिल्या रोपट्याची लागवड १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. हे रोपटे थेट अ फगाणिस्थानमधून आणण्यात आले आहेत.
अफगाणिस्थानमधून आणण्यात आलेल्या हिंगाच्या बियांचे पालमपूर स्थित हिमालय जैवविविधता प्रक्रिया संस्थेमध्ये वैज्ञानिक पद्धतीने रोपटी बनविण्यात आली आहेत. या रोपट्यांची लागवड लाहौल स्पीतीच्या जिल्ह्यात केली जात आहे. आयएचबीटीचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर तेथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत.
सध्या केवळ सातच शेतकऱ्यांना हे रोपटे प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहे. क्वारिंगचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रिगजिन ह्यरपा यांच्या शेतात हिमालय जैवविविधता प्रक्रिया संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार यांनी पहिले रोपटे लावले.
हिंगाच्या शेतीसाठी थंड ठिकाण आणि अन्य नैसर्गिक गोष्टींची गरज आहे. यामुळे देशात हिं गाची शेती होत नव्हती. आता मात्र थेट अफगाणिस्थानमधून हिंगाच्या बिया आणण्यात आल्या आहेत. त्यावर प्रक्रिया करून हि रोपटी उगवण्यात आली आहेत. भारतात वर्षाला १२०० टन हिंग खपते. यामध्ये ९० टक्के हिंग अफगाणिस्थानमधून, ८ टक्के उज्बे किस्तानातून आणि इराणहून २ टक्के हिंग दरवर्षी आयात केला जातो.
पालमपूरच्या संशोधन संस्थेमध्ये हिंगाच्या रोपट्यांच्या सहा प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून संशोधन केल्यानंतर लाहौल घाटीची जागा हिंगासाठी अनुकूल असल्याचे दिसून आले. याशिवाय उत्तराखंडच्या डोंगररांगा, लडाख, किन्नौर आणि जनझेलीच्या डोंगररांगा हिंगासाठी चांगल्या असल्याचे आढळल्या आहेत.
हिंगाच्या शेतीसाठी २० ते ३० डिग्री तापमान असणे गरजेचे आहे. लाहौलमध्ये चार गावांतील ७ शेतकऱ्यांना ही रोपटी देण्यात आली आहेत. ८ एकर क्षेत्रामध्ये ही लागवड होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हिंगाची किंमत ३५००० रुपये प्रति किलो आहे. भारत सर्वाधिक आयात करणारा देश आहे. हिमालयाच्या भागात हिंगाचे उत्पादन सुरु झाल्यास तेथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. तुम्हाला लागवड करायची असेल तर अगोदर सर्व गोष्टींची माहिती घ्यावी लागणार आहे.